शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातनं कोलकातावर मिळवला दणदणीत विजय

By admin | Updated: April 22, 2017 08:37 IST

कोलकाता नाइट रायडर्सनं दिलेलं 188 धावांचं लक्ष्य पार करत गुजरातनं 4 गडी राखून विजय साजरा केला आहे

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 21 - कोलकाता नाइट रायडर्सनं दिलेलं 188 धावांचं लक्ष्य पार करत गुजरातनं 4 गडी राखून विजय साजरा केला आहे. रैना आणि जडेजाच्या 58 धावांच्या भागीदारीमुळे गुजरातचा विजय सुनिश्चित झाला. कर्णधार सुरेश रैनानं दमदार फलंदाजीच्या जोरावर 46 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 84 धावा केल्या आहेत. तर फिंच (31) आणि मॅकक्युलम (33) धावा काढून तंबूत परतले आहेत. एकंदरीतच गुजरात लायन्सनं शानदार फलंदाजीचा नजराणा पेश केला आहे. 

तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने तुफान आक्रमण करत गुजरात लायन्सविरुद्ध 10 षटकात 1 बाद 96 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर सुनील नरेनने केवळ 17 चेंडूत 42 धावांचा तडाखा देत गुजरातची गोलंदाजी फोडून काढली होती. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर नाणेफेक जिंकून कर्णधार गौतम गंभीरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

पॉइंट्स टेबल

 गेल्या सामन्यात सुनील नरेनला सलामीला पाठविण्याची रणनीती यशस्वी ठरल्यानंतर पुन्हा एकदा गंभीरने तीच चाल केली होती. नरेनने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना गुजरातच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. मात्र तरीही कोलकात्याला पराभव पत्करावा लागला आहे. प्रवीण कुमार, जेम्स फॉल्कनर, बसिल थम्पी यांंचा नरेनने चांगलाच समाचार घेत चेंडू सीमापार धाडण्याचा धडाका लावला होता.