शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

लेखी हमी द्या, तरच संघ भारतात येणार

By admin | Updated: March 11, 2016 03:49 IST

विश्वकप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारत सरकारकडून जोपर्यंत सुरक्षेबाबत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तान संघ भारतात दाखल होणार नाही, असे पाकिस्तान सरकारने सांगितले.

लाहोर : विश्वकप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारत सरकारकडून जोपर्यंत सुरक्षेबाबत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तान संघ भारतात दाखल होणार नाही, असे पाकिस्तान सरकारने सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून लाहोरमध्ये पाक संघ प्रतीक्षा करीत आहे.पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीच्या हवाल्यानुसार राष्ट्रीय संघ शुक्रवारी भारताकडे प्रयाण करण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे (पीसीबी) आपल्या संघाला आयसीसी स्पर्धेसाठी भारतात जाण्यास मंजुरी मिळू शकते. दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले, की पाक सरकारने क्रिकेट संघाला भारतात जाण्यास अद्याप परवानगी दिली नाही, कारण भारत सरकारतर्फे त्यांना सुरक्षेबाबत कुठलेही आश्वासन मिळालेले नाही. पीसीबीने संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने धरमशाला येथे १९ मार्च रोजी होणारा सामना कोलकातातील ईडन गार्डनवर स्थानांतरितणाचा निर्णय घेतला. > आश्वासन मिळाले नाही तर संघ जाणार नाही : निसारलाहोर : पाकिस्तान संघ टी-२० विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अद्याप भारतात दाखल झालेला नाही. पाक संघ अद्याप त्यांच्या सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. त्यात पाकिस्तानचे मंत्री चौधरी निसार अली खान यांनी धमकीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट कसे खेळता येईल, असे भडकवणारे वक्तव्य केले आहे. चौधरी निसार अली म्हणाले, धमकी मिळत असताना क्रिकेट कसे खेळता येईल. त्यामुळे यापूर्वी सुरू असलेल्या वादात आणखी तेल ओतले गेले. आयसीसीने पाकिस्तान संघाच्या सुरक्षेच्या चिंतेची दखल घेताना पूर्वघोषित कार्यक्रमानुसार १९ मार्च रोजी धरमशाला येथे खेळला जाणारा सामना कोलकाता येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला, पण पीसीबीला भारताकडून पूर्ण सुरक्षेची हमी पाहिजे आहे. चौधरी निसार अली म्हणाले, ‘धमकी केवळ पाकिस्तानबाबत आहेत. दहशतीच्या सावटात संघ सर्वोत्तम कामगिरी कशी करणार? भारत सरकारने संघाला फुलप्रूफ सुरक्षेची हमी द्यायला हवी. जर आम्हाला तसे आश्वासन मिळाले नाही तर पाक संघ भारतात जाणार नाही.’पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले, अन्य संघांना विरोध होत नाही आणि त्यांना लक्ष्यही केले जात नाही, पण पाकिस्तानबाबत वेगळी भूमिका आहे. त्यामुळे भारत सरकारकडून पूर्ण सुरक्षेच्या आश्वासनाची प्रतीक्षा आहे.’ >> निर्णय पाकच्या हातात : ठाकूरनवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूरने गुरुवारी रात्री टी-२० विश्वचषक खेळण्याचा निर्णय आता पाकिस्तानच्या हाती असल्याचे वक्तव्य बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केले आहे. ठाकूर म्हणाले, की भारत विश्वचषकच्या सर्व संघांना संपूर्ण सुरक्षा देईल. मात्र आता पाकिस्तानला निर्णय घ्यायचा आहे, की त्यांना भारतात यायचे आहे की नाही. ठाकूर म्हणाले, की पाकिस्तान बहाणा करत आहे. मात्र भारत सर्व संघांना संपूर्ण सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. बीसीसीआयचे सचिव म्हणाले, की आम्ही प्रत्येक देशाला आम्ही वेगवेगळा ग्रीन सिग्नल देऊ शकत नाही. तरी आमच्याकडून पूर्ण ग्रीन सिग्नल आहे. पाकिस्तानने भारतात खेळण्यासाठी यावे, असेही ते म्हणाले.