शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

हरित नोहा ठरला ‘सुपरक्रॉस चॅम्पियन’

By admin | Updated: April 16, 2017 22:16 IST

टीव्हीएस मोटर्सच्या हरित नोहाने एसएक्स-१ फॉरेन खुल्या-अ गटात बाजी मारत राष्ट्रीय सुपरक्रॉस मोटारसायकल चॅम्पियनशिप जिंकली

ऑनलाइन लोकमतमडगाव, दि. 16 - टीव्हीएस मोटर्सच्या हरित नोहाने एसएक्स-१ फॉरेन खुल्या-अ गटात बाजी मारत राष्ट्रीय सुपरक्रॉस मोटारसायकल चॅम्पियनशिप जिंकली. केरळच्या सीडी जिनावने दुसरे तर टीव्हीएसच्या ऋग्वेद बार्गारेने तिसरे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्राच्या युवराज कोंडे देशमुखने ज्युनियर गटात अव्वल स्थान प्राप्त केले. ही स्पर्धा पुणे येथील गॉडस्पिड रेसिंगतर्फे, गोवा क्रीडा प्राधिकरण आणि स्टॅलवर्ट मोटरस्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.एसएक्स-२ फॉरेन खुल्या गटात त्रिसूरच्या महेश व्ही.एम.ने प्रथम स्थान व ज्युनियर एसएक्स गटात गोव्याच्या झबिया मुलियाने बाजी मारली. स्पर्धा नावेली येथील ट्रॅकवर झाली. बक्षीस वितरणास नावेलीचे आमदार लुइझिन फालेरो, गॉडस्पिड रेसिंगचे श्याम कोठारी, सागचे कार्यकारी संचालक व्हि.एम. प्रभुदेसाई उपस्थित होते. गटनिहाय निकाल असा : एसएक्स-१ फॉरेन खुला गट -‘अ’ : हरित नोहा- टीव्हीएस, सीडी जिनावो- केरळ, ऋग्वेद बी.-टीव्हीएस, तन्वीर ए.एम.-टीव्हीएस, सुहाली अहमद- बंगळुरू. एसएक्स-१ फॉरेन खुला गट -ब : महेश व्ही.-त्रिसूर. एम.के. मोहन - डिंडीगुल, फाबिन ज्योस- कोचीन, ज्योस डेविड-जयपूर, व्यंकटेश शेट्टी- मुंबई. क्लास फोर गट -बी : झबिया मुलिया, अंकुश राय , आदर्श के., अल्ताफ एल., अस्कर अली (सर्व गोवा). इंडियन एक्स्पर्ट ग्रुप- सी : जे. कुमार- कोईम्बतूर, आर. नारिया- टीव्हीएस, स्टिफन आर- कोईम्बतूर, महेश व्ही. एम. - त्रिसूर, सुहेल अहमद - बंगळुरू, स्टिफन राज - कोईम्बतूर, ज्योस डेविड - जयपूर, क्लास ७ एसएक्स -२ : साजित ए.एस.- त्रिसूर, पृथ्वी सिंग - चंदिगड, अदनान अहमद - मंगळुरू, एम. एस. प्रिन्स - दिल्ली, झे. खान - मुंबई, क्लास बी- जेआरएस एक्स : युवराज के. -पुणे, प्रज्वल - बंगळुरू, आपाली कुरैय्या - कोचीन, करण के. - पुणे.