शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट महाकुंभाला शानदार सुरुवात

By admin | Updated: February 13, 2015 06:33 IST

कर्णमधुर संगीताच्या स्वरलहरी..., नयनरम्य लाईट शो..., लोकनृत्याची मेजवानी; तसेच आसमंतात चकाकी आणणा-या भव्य आतषबाजीच्या साक्षीने शनिवारपासून

ख्राईस्टचर्च : कर्णमधुर संगीताच्या स्वरलहरी..., नयनरम्य लाईट शो..., लोकनृत्याची मेजवानी; तसेच आसमंतात चकाकी आणणा-या भव्य आतषबाजीच्या साक्षीने शनिवारपासून (दि. १४) सुरू होत असलेल्या क्रिकेट विश्वचषकाचे गुरुवारी शानदार समारंभात भव्य उद्घाटन पार पडले. १४ संघांदरम्यान दीड महिना रंगणाऱ्या क्रिकेटच्या या महाकुंभाची सुरुवात न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील हेग्ले पार्क आणि मेलबोर्नच्या मायर म्युझिक बाऊल येथे एकाचवेळी झाली. तीन तास रंगलेल्या या सोहळ्याला महान खेळाडूंसह हजारो क्रिकेटशौकिनांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘बॅगपायपर’ची धून वाजविण्यात आली; तर आतषबाजीने सोहळा संपविण्यात आला. ‘माओरी वॉरियर्स’ तसेच ‘मॉरिस डान्सर्स’ या पथकांचे नृत्य सोहळ्याचे आकर्षण ठरले.आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्या संयुक्तविद्यमाने २३ वर्षांनंतर विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये या शहराने भूकंपाचे भीषण धक्के अनुभवले होते. त्यात १८५ लोकांना प्राण गमवावे लागले. त्या दुर्दैवी घटनेचे साक्षीदार असलेल्या अनेक आठवणी आजही शिल्लक आहेत. कधीकाळी या ठिकाणी गगनचुंबी इमारती होत्या. आज ओसाड मैदाने आहेत; पण ख्राईस्टचर्चच्या लोकांचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम तसूभरही कमी झाले नसल्याचा पुरावा देणारा हा सोहळा होता.शहराचे महापौर लीने डॅलझिएल म्हणाले, ‘‘भूकंप झाला त्या वेळी हे शहर २०११ च्या रग्बी विश्वचषकाची तयारी करीत होते. भूकंपामुळे हॉटेल आणि आयोजनस्थळांना फटका बसला. सामन्यांचे आयोजन अन्य स्थळी हलविणे भाग पडले होते. पुन्हा एकदा परत आलो आहोत.’’न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन यांनी स्पर्धा सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘भूकंपाने ख्राईस्टचर्चकडून रग्बी विश्वचषकाच्या आयोजनाची संधी हिरावून घेतली होती. क्रिकेट विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्याने ही उणीव भरून काढली आहे. या सोहळ्याद्वारे ख्राईस्टचर्च पुन्हा उभे झाले असल्याचा संदेश देण्याची वेळ आली आहे.’’न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यात शनिवारी उद्घाटनाचा सामना हेग्ले ओव्हलवर खेळला जाईल. त्याच दिवशी मेलबोर्न येथे आॅस्ट्रेलिया-इंग्लंड हा दुसरा सामना होईल. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांच्या हस्ते विश्वचषकाचे अनावरण करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यासह क्रिकेटशौकिनांचा उत्साह, सहभागी राष्ट्रांच्या संस्कृतीचा उत्सव आणि ख्राईस्टचर्चच्या लोकांची संकटाकडून सौहार्दाकडे वाटचाल सुरू झाली आहे. (वृत्तसंस्था)