शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने आमची दखल घ्यावी

By admin | Updated: July 2, 2015 03:16 IST

आश्विनी पोनप्पाच्या सोबतीने कॅनडा ओपन बॅडमिंटनचे जेतेपद पटकविणारी स्टार खेळाडू ज्वाला गुट्टा हिने पुढील वर्षी रियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी किमान

हैदराबाद : आश्विनी पोनप्पाच्या सोबतीने कॅनडा ओपन बॅडमिंटनचे जेतेपद पटकविणारी स्टार खेळाडू ज्वाला गुट्टा हिने पुढील वर्षी रियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी किमान सरकारने आमची मदत करावी, असे आवाहन केले.ज्वाला येथे परतल्यानंतर म्हणाली, ‘‘आघाडीच्या खेळाडंूना जशी मदतीची गरज असते तीच गरज आम्हालादेखील आहे. अर्थात, एकेरीतील खेळाडूंना ज्या सुविधा पुरविल्या जातात त्याच सुविधा आम्हाला मिळायला हव्यात. सोयी मिळाल्यास मी आणि आश्विनी आॅलिम्पिक पदक जिंकू शकतो. आम्हाला दूर ठेवण्यात ज्यांचा हात असेल त्यांनी आतातरी जागे व्हावे. खेळाडू म्हणून मी सराव करू शकते. आपल्या खेळाचा दर्जा उंचावू शकते. खेळातील उणिवा दूर सारू शकते. मला दिल्लीत कुणाच्या मागे धावण्याची गरज पडू नये. आॅलिम्पिकसाठी दुहेरीत भारताला पदकाची अपेक्षा आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर सहकार्याची गरज राहील. कॅनडा ओपन जिंकल्यानंतर किमान क्रीडा मंत्रालय आमच्या पाठीशी उभे राहील आणि सहकार्याचा हात देईल, अशी आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)बॅडमिंटन खेळाडूंना सरकारचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. एकेरीत खेळाडूंची कामगिरी चांगली होण्यामागील कारण सरकारतर्फे दिली जाणारी मदत हे आहे. सरकारचा पाठिंबा नसेल, तर खेळाडूंना पराभवाचे तोंड पाहावे लागते. खरेतर आम्ही सरकारच्या मदतीवर विसंबून असतो. सरकारकडून पाठिंबा मिळत नसल्याने खेळाडू दुहेरीकडे वळताना धास्तावतात. याशिवाय मिश्र प्रकारातही माझ्यानंतर खेळाडू सापडेनासे झाले आहेत. मी विश्वक्रमवारीत सहाव्या स्थानावर होती, पण त्यानंतर एकही खेळाडू देशातर्फे पुढे आलेला नाही. -ज्वाला गुट्टा