शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णकन्येने गावाला झळकाविले विजेने

By admin | Updated: September 1, 2016 06:10 IST

आॅलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकल्यानंतर त्या खेळाडूवर विविध स्तरांतून बक्षिसांचा वर्षाव होत असतो. भारतातही रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य व कांस्यपदक विजेत्या

नैरोबी : आॅलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकल्यानंतर त्या खेळाडूवर विविध स्तरांतून बक्षिसांचा वर्षाव होत असतो. भारतातही रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य व कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांच्यावर भरघोस बक्षिसांचा वर्षाव झाला. अगदी बीएमडब्ल्यूसारखी महागडी गाडीदेखील खेळाडूंना बक्षीस म्हणून मिळाली. मात्र, आफ्रिका खंडातील केनिया देशाच्या फेथ किपीएगन हिने अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकाचे बक्षीस म्हणून संपूर्ण गावाला ‘वीज’ मिळाली आहे.फेथ केनियाच्या नदाबिबित या खेडेगावाची रहिवासी असून, तिच्या गावात तब्बल १९८० सालापासून वीज नाही. दखल घेण्याची बाब म्हणजे, या कारणामुळे फेथच्या कुटुंबीयांना आपल्या मुलीने केलेला पराक्रम पाहता आला नाही. फेथने रिओ आॅलिम्पिकमध्ये १५०० मीटर शर्यतीत सुवर्ण पटकावताना यंदाच्या वर्षातील सर्वांत वेगवान वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला. मात्र, वीज नसल्याने आपल्या मुलीची ही विक्रमी कामगिरी पाहण्याची संधी मुकल्याने तिचे वडील कोएच यांनी थेट राष्ट्राध्यक्ष उहुरू केन्याट्टा यांच्याकडे विनंती केली की, ‘कृपया आमच्या गावामध्ये वीज आणावी. यामुळे मी माझ्या मुलीला केनियासाठी अधिक पदक जिंकताना पाहू शकेल.’’ विशेष म्हणजे, फेथच्या वडिलांनी केलेल्या विनंतीला केनियन सरकारनेही तत्काळ प्रतिसाद देताना फेथच्या गावामध्ये वीजपुरवठा केला. त्याचबरोबर, एका जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनेदेखील फेथच्या घरी अत्याधुनिक फ्लॅट स्क्रीन टीव्हीची भेट दिली. फेथने रिओ आॅलिम्पिकमध्ये केलेल्या विक्रमी कामगिरीमुळे आज तिचे संपूर्ण गाव उजळले आहे. विशेष म्हणजे गेल्या ३० वर्षांत पहिल्यांदाच फेथच्या गावकऱ्यांनी वीज पाहिली. त्याच वेळी वडील कोएच यांनी मात्र या यशाचे सर्व श्रेय आपल्या मुलीला देताना सांगितले की, ‘‘फेथने घेतलेल्या मेहनतीमुळे आणि तिने केलेल्या पराक्रमामुळेच आज गावामध्ये वीज पाहायला मिळत आहे.’’थोडक्यात, शंभर करोडहून अधिक लोकसंख्येचा भारत देश आॅलिम्पिकमध्ये पदकासाठी झगडत असताना, कोणतीही मूलभूत सोयीसुविधा नसलेल्या केनियाच्या एका खेडेगावातील मुलगी थेट आॅलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घालते, ही बाब निश्चित विचार करण्यास लावते. सुमारे ३ दशके अंधारात घालवलेल्या गावाला आपल्या मुलीने मिळवलेल्या आॅलिम्पिक सुवर्णपदकामुळे वीज मिळाली. (वृत्तसंस्था)