शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताचे नेतृत्व

By admin | Updated: September 3, 2016 00:44 IST

येथील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये शनिवारी प्यूृर्टो रिको देशाविरुद्ध होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात

मुंबई : येथील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये शनिवारी प्यूृर्टो रिको देशाविरुद्ध होणाऱ्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग सिंधूकडे भारताची धुरा सोपविण्यात आली. राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्सटेनटाइन शुक्रवारी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. कॉन्सटेनटाइन यांनी यावेळी सांगितले की, ‘‘या मैत्रीसामन्यासाठी गुरप्रीत भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल.’’ २४ वर्षीय गुरप्रीतसाठी कर्णधार म्हणून मोठा सन्मान मिळाला आहे. विशेष म्हणजे यासह भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल. त्याने नॉर्वे देशाच्या स्टाबीक एफसीकडून खेळताना गुरप्रीतने युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारा पहिला भारतीय असा लौकिक मिळवला आहे.हुकमी सुनिल छेत्रीच्या जागी गुरप्रीतची कर्णधारपदी निवड झाली असल्याने, अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉलला या सामन्यात बाहेर असणार हे निश्चित आहे. नुकताच पॉलला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसरीकडे, १९५५ सालानंतर पहिल्यांदाच मुंबइत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना होत आहे. त्यावेळी मुंबईत भारत विरुद्ध सोवियत संघ यांच्यात सामना झाला होता. प्यूर्टो रिको संघाविरुध्द बाजी मारल्यास भारत जागतिक क्रमवारीत नक्कीच आपले स्थान सुधारु शकतो. सध्या भारत १५२व्या स्थानी असून प्यूर्टो रिको ११४व्या स्थानी विराजमान आहे.शुक्रवारी संध्याकाळी प्यूर्टो रिको संघाचे भारतात आगमन झाले असून याचा भारताला फायदा होणार नसल्याचे प्रशिक्षकांंनी सांगितले. कॉन्सटेनटाइन म्हणाले की, ‘‘त्यांच्याकडे काही शानदार खेळाडू आहेत. हा मुंबईत स्थिरावण्यास त्यांना नक्कीच कमी वेळ मिळेल. पण, तरीही यामुळे त्यांची क्षमता कमी होणार नाही.’’ (क्रीडा प्रतिनिधी)