शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘बेंच स्ट्रेंथ’ला संधी देणार

By admin | Updated: March 3, 2016 04:16 IST

विजयाची हॅट्ट्रिक साधल्याने आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी कमकुवत संयुक्तअरब अमिरातविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीत राखीव

मीरपूर : विजयाची हॅट्ट्रिक साधल्याने आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी कमकुवत संयुक्तअरब अमिरातविरुद्ध अखेरच्या साखळी लढतीत राखीव खेळाडूंना ‘दम’ दाखविण्याची संधी देण्याच्या विचारात आहे.कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघात अधिक बदल पसंत करीत नाही; पण लंकेविरुद्ध पाच गड्यांनी विजय नोंदविल्यानंतर कालच त्याने राखीव खेळाडूंना पुढच्या सामन्यात संधी देण्याचे संकेत दिले होते. याचा अर्थ असा की अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, पवन नेगी, भुवनेश्वर कुमार यांच्यापैकी किमान दोघातिघांना संधी दिली जाईल. संघात फारसा बदल राहणार नाही, पण दोन किंवा तीन नवे चेहरे असतील, असे धोनीने सांगितले. रहाणेला शिखर धवनऐवजी तर भुवनेश्वरला नेहराऐवजी खेळविले जाईल. महिनाभरात नऊ टी-२० सामने खेळणाऱ्या नेहराला विश्रांती दिली जाईल. भुवनेश्वर वन डे विश्वचषकानंतर वर्षभरापासून संघाबाहेर आहे. त्याने स्विंगमधील लय गमावली, पण यूएईसारख्या कमकुवत संघाविरुद्ध त्याला ही लय परत मिळविण्याची चांगली संधी राहील. हरभजन आणि पवन नेगी हे दोन्ही फिरकीपटू आश्विन तसेच जडेजा यांचे स्थान घेऊ शकतात. आयपीएल लिलावात सर्वाधिक महागडा ठरलेल्या पवन नेगीला आशिया चषकात सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. यूएई संघ गोलंदाजीत चांगलाच आहे. अमजद जावेद याच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी माऱ्याने प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीला धक्के दिले होते. पण लंका, बांगलादेश आणि पाकच्या तुलनेत भारतीय फलंदाजी भक्कम आहे. त्यामुळे यूएईविरुद्धचा हा सामना भारतासाठी सराव सामन्यासारखाच असेल. > सामना : सायंकाळी ७ वाजेपासून> भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, आशिष नेहरा, जसप्रीत बुमरा, पवन नेगी, हरभजनसिंग, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, पार्थिव पटेल.संयुक्त अरब अमिरात : अमजद जावेद (कर्णधार), अहमद रजा, मोहम्मद नावेद, मोहम्मद शहजाद, मोहम्मद कलीम, मोहम्मद उस्मान, स्वप्निल पाटील, कादिर अहमद, रोहन मुस्तफा, सकलेन हैदर, शैमान अन्वर, उस्मान मुश्ताक, जहीर मकसूद.