गेलची दुसर्या कसोटीतून माघार
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
सेंट लुसिया: वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने वैयक्तिक कारणास्तव बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसर्या आणि अंतिम कसोटीतून माघार घेतली आह़े वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने त्याला परवानगी दिली आह़े गेलच्या जागी गुयानाच्या 27 वर्षीय लियोन जॉनसनला संघामध्ये घेण्यात आले आह़े जॉनसन या सामन्याद्वारे आपल्या कसोटी करिअरमध्ये पदार्पण करणार आह़े गेलशिवाय विंडीजने आपल्या ...
गेलची दुसर्या कसोटीतून माघार
सेंट लुसिया: वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने वैयक्तिक कारणास्तव बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसर्या आणि अंतिम कसोटीतून माघार घेतली आह़े वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने त्याला परवानगी दिली आह़े गेलच्या जागी गुयानाच्या 27 वर्षीय लियोन जॉनसनला संघामध्ये घेण्यात आले आह़े जॉनसन या सामन्याद्वारे आपल्या कसोटी करिअरमध्ये पदार्पण करणार आह़े गेलशिवाय विंडीजने आपल्या 13 सदस्यीय संघामध्ये कोणतेही बदल केलेले नाही़ यापैकी शेन शिलिंगफोर्ड आणि जेसन होल्डर यांना लुसियातील पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी दिली नव्हती़