शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मांजरेकरच्या ड्रीम संघात गांगुलीला स्थान नाही

By admin | Updated: September 25, 2016 20:45 IST

टीम इंडियाच्या ५00 व्या कसोटीचा उत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना भारताचा ड्रीम संघ निवडण्याची संधी दिली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या ५00 व्या कसोटीचा उत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना भारताचा ड्रीम संघ निवडण्याची संधी दिली. त्यानंतर भारताचा माजी कसोटीपटू आणि आता समालोचक संजय मांजरेकर यानेदेखील आपल्या ड्रीम संघाची घोषणा केली आहे. मांजरेकरने त्याच्या ड्रीम संघात सलामीवीर फलंदाजाच्या रूपात लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला पसंती दिली आहे. याशिवाय मांजरेकरने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी माजी कर्णधार राहुल द्रविड आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला संघात घेतले आहे.पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी माजी दिग्गज खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून टीम इंडियाचा विद्यमान वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान देण्यात आले आहे. मांजरेकरने त्याच्या ड्रीम संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीदेखील धोनीवर सोपवली आहे. १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार कपिलदेव याला अष्टपैलू म्हणून, तर माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याला आठव्या स्थानासाठी संघात ठेवले आहे.फिरकी गोलंदाजांच्या विभागातही मांजरेकरने त्याच्या संघात माजी दिग्गज गलेंदाज बिशनसिंह बेदी आणि इरापल्ली प्रसन्ना यांना स्थान दिले आहे. ११ वा खेळाडू म्हणून भागवत चंद्रशेखर यांनी संघात स्थान दिले आहे. मांजरेकरने गांगुलीशिवाय टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळेंनादेखील स्थान दिलेले नाही.