सोलापूर ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी
By admin | Updated: August 21, 2014 22:10 IST
सोलापूर: सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी होणार आहेत़ दि़ 22 ते 24 ऑगस्टदरम्यान पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील मैदानावर होणार्या या स्पर्धेत सोलापूर ग्रामीण विभाग, बार्शी, पंढरपूर व पोलीस मुख्यालय असे चार संघ सहभाग नोंदविणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी कळविले आह़े
सोलापूर ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी
सोलापूर: सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी होणार आहेत़ दि़ 22 ते 24 ऑगस्टदरम्यान पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील मैदानावर होणार्या या स्पर्धेत सोलापूर ग्रामीण विभाग, बार्शी, पंढरपूर व पोलीस मुख्यालय असे चार संघ सहभाग नोंदविणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी कळविले आह़ेया स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार असून, यामध्ये फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो अशा सांघिक स्पर्धा होणार आहेत़ तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये लांबउडी, उंचउडी, 100, 200, 400, 800 व 1500 मी़ धावणे स्पर्धेसह जलतरण स्पर्धेचाही समावेश आह़ेया स्पर्धेचे शुक्रवार, दि़ 22 ऑगस्ट रोजी उद्घाटन तर बक्षीस वितरण दि़ 24 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते होणार आह़े