शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रोचे कर्करोगाने निधन

By admin | Updated: March 3, 2016 08:13 IST

न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रो याचे वयाच्या ५३व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. मागील काही दिवसापासून त्याची कर्करोगाशी झुंज सुरु होती.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टीन क्रो याचे वयाच्या ५३व्या वर्षी कर्करोगाने निधन झाल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे. काही वर्षांपासून दिवसापासून त्याची कर्करोगाशी झुंज सुरु होती पण मैदानात सतत जिंकणाऱ्या हा लढावय्या कर्करोसमार हरला. 
 मार्टिन क्रो यांना वयाच्या ५० व्या वर्षी ‘लिफोंमा’ या प्रकारचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. क्रो हे न्यूझीलंडच्या सर्वोतम फलंदाजांपैकी एक मानले जातात. 
 
१९९२ साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत मार्टिन क्रो यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. साखळीत दबदबा निर्माण करणा-या न्यूझीलंडला उपांत्यफेरीत पाकिस्तानकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. त्या वर्ल्डकपमध्ये मार्टिन क्रो यांनी सर्वाधिक ४५६ धावा केल्या होत्या.
 
१९९१ साली कसोटीत श्रीलंकेच्या विरोधात त्यांनी केलेल्या २९९ धावा या न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या सर्वाधिक धावा आहेत. ७७ कसोटी सामन्यात ४६ च्या आव्हरेजने  ५४४४ धावा त्यांच्या नावावर आहेत. १९८२ साली त्यांनी पदार्पन केले तर १९९५ साली भारताविरुद्ध खेळलेला त्यांचा शेवटाचा सामना होय. एकदिवसीय सामन्यात ४७०४ धावा त्यांच्या नावावर आहेत.