नॉटिंघम : भारतीय संघातही काही फुटबॉल चाहते खेळाडू आहेत. फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना हे खेळाडू सामने पाहणार नसतील तर नवलच. काही खेळाडूंचे तर आवडीचे संघ आणि खेळाडू देखील आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये जर्मनीकडून ब्राझीलचा 7-1 ने धुव्वा उडाल्यामुळे काही खेळाडूंना तर शॉक
बसला. उपांत्य सामन्यासाठी
विराट कोहलीने अर्जेटिनाला
भक्कम पाठिंबा जाहीर
केला. विराटसह अनेकजण असे मानतात की, लियोनेल मेस्सी
पुन्हा एकदा अर्जेटिनासाठी स्टार ठरेल.
च्इंडियन टीम ‘पार्क प्लाझा’ या आवडत्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. हे हॉटेल शहराच्या हृदयस्थानी अर्थात सिटी सेंटरच्या शेजारीच आहे. या हॉटेलच्या विरुद्ध दिशेला भारतीय रेस्टॉरंट आहेत.
च्त्यांच्यापैकी काहींची नावे ‘चटनी’, ‘बॉम्बे डिलाईट’, ‘कलकत्ता क्लब’ आणि ‘चेन्नई’ अशी आहेत. ही सर्व हॉटेल्स हाकेच्या अंतरावर असल्याने भारतीय खेळाडू घरच्या मेन्यूचा आनंद उपभोगू शकतात. वेगळे पदार्थ मिळाले तरी हरकत नाही; पण अखेर भारतीय जेवण ते भारतीय जेवणच, अशी अनेकांची भावना आहे. त्यातही खेळाडूंची आवडती डिश म्हणजे चिकन टिक्का मसाला आणि तंदुरी रोटी !!