शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

भारताने पाकला दिलेला शब्द पाळावा : पीसीबी

By admin | Updated: September 7, 2015 00:10 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘बिग थ्री’ व्यवस्थेच्या समर्थनार्थ भारताने पाकिस्तानला दिलेले वचन पूर्ण करावे, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष

कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘बिग थ्री’ व्यवस्थेच्या समर्थनार्थ भारताने पाकिस्तानला दिलेले वचन पूर्ण करावे, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले. शनिवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शहरयार यांनी आपले मत व्यक्त केले.‘बिग थ्री’चे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानकडे स्वत:चे कारण होते आणि यामध्ये भारताबरोबर द्विपक्षीय मालिका खेळण्याचेदेखील ठरले होते. भारताने आमच्यासोबत पुन्हा एकदा क्रिकेटसंबंध सुरू करण्याविषयी वचन दिले होते आणि यानंतर आम्ही ‘बिग थ्री’ व्यवस्थेला समर्थन दिले. यानंतरच बीसीसीआयने २०१५ ते २०२३ पर्यंत सहा मालिका खेळण्याचा करार केला होता, असेही शहरयार खान यांनी सांगितले.शहरयार यांनी याबाबत आणखी सांगितले, की बीसीसीआयने जे वचन आम्हाला दिले होते ते त्यांनी पाळावे, हीच आमची अपेक्षा आहे. अजूनही भारत-पाक मालिकेबाबत मी आशावादी आहे. दरम्यान, दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये झालेल्या करारानुसार पहिली क्रिकेट मालिका डिसेंबर २०१५ महिन्यात होणार असून यामध्ये दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी-२० सामन्यांचा समावेश आहे. ही मालिका पाकिस्तानच्या यजमानपदाखाली यूएईमध्ये खेळवली जाण्याची योजना होती. त्याचवेळी या वृत्ताबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून बीसीसीआय सध्या सरकारकडून येणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. (वृत्तसंस्था)