शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

By admin | Updated: November 11, 2016 00:57 IST

पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षे गटाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर बारीक लक्ष असल्याचे अ. भा. फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षे गटाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर बारीक लक्ष असल्याचे अ. भा. फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.देशात फुटबॉलच्या विकासासाठी आता आम्ही योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे सांगून खा. पटेल पुढे म्हणाले, की पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच विश्वचषकाच्या तयारीचा वारंवार आढावा घेतला जात आहे. ज्या पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत, त्या वेळेच्या आत पूर्ण होतील याची खबरदारी म्हणून आम्ही वारंवार बारकाईने लक्ष ठेवून आहोत. व्यापक स्तरावर सुविधा उपलब्ध कशा होतील, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. भारताचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया याने अलीकडे भाष्य करताना देशात फुटबॉलच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुधारणांच्या उभारणीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती. यावर पटेल यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, की एआयएफएफने यंदा आयोजित केलेल्या १६ वर्षांखालील यूथ लीगमध्ये अनेक संघांचा सहभाग होता. अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग असणे म्हणजे पुढील वर्षीच्या १७ वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला अनेक पर्याय उपलब्ध असणे, असा आहे. पायाभूत स्तरावर सुधारणांची गरज असल्याचे जेव्हा बोलतो तेव्हा कुठलाही शॉर्टकट नको. शॉर्टकटमुळे देशात फुटबॉलचा विकास होणार नाही. त्यासाठी बाल्यावस्थेपासून टॅलेंट शोधून त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागेल. १६ वर्षे गटाची लीग हा उत्तम पर्याय आहे. यातून देशासाठी १२-१३ वर्षे खेळणारे प्रतिभावान खेळाडू तयार होऊ शकतील, असा मला विश्वास वाटतो. (वृत्तसंस्था)