शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

किंग पाँग संघ पहिला विजेता

By admin | Updated: June 23, 2015 01:47 IST

अखेरच्या लढतीपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात किंग पाँग संघाने झुंजार खेळाच्या जोरावर हाय टाइड संघाचा ५-४ असा पाडाव करून पहिल्या

मुंबई : अखेरच्या लढतीपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात किंग पाँग संघाने झुंजार खेळाच्या जोरावर हाय टाइड संघाचा ५-४ असा पाडाव करून पहिल्यावहिल्या मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने खार जिमखाना येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. विजयी संघाला माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.दिव्या महाजन आणि ओम्कार तोरगळकर यांनी आपआपल्या एकेरी सामन्यात सहज बाजी मारताना किंग पाँग संघाला ९ लढतींच्या या सामन्यात २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र तिसऱ्या लढतीत हाय टाइडच्या मंदार हर्डिकरने अनपेक्षित निकाल लावताना अनुभवी मुनित दाणीचा ११-८, ८-११, ११-८, ६-११, १२-१० असा पराभव करून संघाची पिछाडी १-२ अशी कमी केली.ओम्कार - दिव्या यांनी मिश्र दुहेरीमध्ये हर्ष मणियार - मृण्मयी म्हात्रे यांचा ३-१ असा पराभव करून किंग पाँगची आघाडी ३-१ अशी वाढवली. तर दक्षिण आशियाई सांघिक व वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्या श्रुष्टी हेलंगडीने तन्विता ठाकूरचा ३-० असा फडशा पाडून हाय टाइडचे आव्हान जिवंत ठेवले. शिवाय, यानंतर लगेच पुढील सामन्यात राजवीर शाहने हाय टाइडसाठी महत्त्वपूर्ण विजय मिळवताना समीहान कुलकर्णीचा ९-११, ११-८, ४-११, ११-५, ११-५ असा पराभव करून सामना ३-३ असा बरोबरीत आणला. ओम्कारने अनुभवी दीपक दुधाणेसोबत खेळताना योगेश देसाई - मणियार या जोडीला ११-९, ५-११, ८-११, १२-१०, ११-५ असे नमवून किंग पाँगला आघाडीवर नेले. तर मंदार - श्रुष्टी या कसलेल्या जोडीने मुदीत -तन्विता यांचा मिश्र दुहेरी लढतीत ९-११, ८-११, ११-९, ११-५, ११-३ असा झुंजार पराभव करून सामना ४-४ असा बरोबरीत आणला.अखेरच्या निर्णायक वेटरन्स एकेरी लढतीत दीपक दुधाणेने अनुभवी योगेश देसाई विरुद्ध पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत ११-३, ११-१३, ११-९, १०-१२, ११-५ असा विजय मिळवला आणि किंग पाँग संघाच्या विजेतेपदावर शिकामोर्तब केले. (क्रीडा प्रतिनिधी)