शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कोल्हापुरात रंगणार अंतिम थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 05:28 IST

मोहितेज रेसिंगचे अभिषेक मोहिते व जे. के. टायरचे अकबर इब्राहिम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर : तेराव्या जे. के. टायर-एफएमएससीआय राष्ट्रीय रोटेक्स मॅक्स कार्टिंग स्पर्धेच्या पाचव्या अणि अंतिम फेरीचे आज, शनिवारपासून आयोजन केल्याची माहिती मोहितेज रेसिंगचे अभिषेक मोहिते व जे. के. टायरचे अकबर इब्राहिम यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कार्टिंगचा हा थरार हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या सर्किट ०९ ट्रॅकवर होणार आहे. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून या पाचव्या फेरीतील पोल पोझिशन फेरी होणार आहे. तर रविवारी अंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धा सिनिअर मॅक्स, ज्युनिअर मॅक्स आणि मायक्रो मॅक्स या तीन गटांत होत असून त्यात देशातील नामवंत रेसिंगपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये अव्वल मानांकित विष्णू प्रसाद (३२८ गुण), रिकी डॉनिसन (३२४ गुण), कोल्हापूरचे धु्रव मोहिते, चित्तेश मंडोडी व मेको रेसिंगचा प्रथमेश देसाई यांच्यातच खरी लढत होणार आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या रेसिंग ट्रॅकवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गो-कार्टिंग रेस होत आहेत. १३ ते १६ वयोगटांतील ज्युनिअर मॅक्स गटात फरिदाबादचा मानव शर्मा (३३४ गुण) आणि बंगरुळचा यश आराध्ये (३२८ गुण) यांच्यात अटीतटीची चुरस होईल. ७ ते १२ वयोगटातील मायक्रो मॅक्स गटात मेको रेसिंच्या शहानअली मोहसिनला तब्बल २0 गुणांची आघाडी असून त्याचे ३४८ गुण आहेत. बंगरुळचा अर्जुन नायर ३२८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यापूर्वीच्या फेऱ्या कोल्हापूरसह बंगलोर, हैदराबाद, कोईमत्तूर येथे पार पडल्या आहेत. पाचवी आणि अंतिम फेरी कोल्हापुरात होत आहे. कोल्हापुरात यापूर्वी झालेल्या शर्यतीत दोन वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या चित्तेश मंडोडी याने अनपेक्षितरित्या दुसऱ्या स्थानावर बाजी मारली होती. (प्रतिनिधी)