शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

फिफाचे सात अधिकारी अटकेत

By admin | Updated: May 28, 2015 01:39 IST

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीदाखल आणि त्यांच्या आग्रहावरून झुरिच येथे बुधवारी पहाटे फिफाच्या सात फुटबॉल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

जिनेव्हा : अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीदाखल आणि त्यांच्या आग्रहावरून झुरिच येथे बुधवारी पहाटे फिफाच्या सात फुटबॉल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. स्वीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांवर कोट्यवधी डॉलरची लाच स्वीकारल्याचा संशय आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्ताला दुजोरा दिला.स्वित्झर्लंडच्या न्याय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘अटक झालेल्यांमध्ये लाचखोर संशयित खेळ मीडिया आणि खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, कथित फुटबॉल अधिकारी, फिफाचे प्रतिनिधी आणि फिफाच्या उपसमितीच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दहा कोटींपेक्षा अधिक डॉलर रकमेची लाच स्वीकारल्याचा या सर्वांवर संशय आहे. या मोबदल्यात लॅटिन अमेरिकेत होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेशी संबंधित माहिती, मीडिया, मार्केटिंग आणि प्रायोजन अधिकार प्राप्त केल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या आग्रहावरून १९९० च्या दशकापासून आतापर्यंत लाच स्वीकारून माहिती पुरविल्याचा सात अधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आला. या अधिकाऱ्यांना प्रत्यारोपण पूर्ण होईस्तोवर कोठडीत ठेवण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये राफेल एसक्विवेल, कोस्टा तकास, जेफ्री वेब, एडवर्डाे ली, युगेनियो फिगुएरेडो, ज्युलिओ रोचा, जोस मारिया मारिन यांचा समावेश आहे.लाचेचीही रक्कम अमेरिकेच्या बँकेतून पाठविण्यात आल्याचीदेखील शंका आहे. स्थानिक झुरिच पोलिसांनी शहरातील मोठ्या हॉटेलमधून सर्वांना ताब्यात घेतले. फिफाला सद्यस्थितीवर स्पष्टीकरण हवे आहे; पण अटक झालेल्यांबद्दल काहीच बोलायचे नाही, असे फिफाच्या प्रवक्त्याने सांगितले.फिफा अध्यक्ष सॅप ब्लेटर हे नव्या कार्यकाळासाठी दावेदारी सादर करण्याच्या दोन दिवसआधी ही घटना घडली. ज्या सात लोकांना ताब्यत घेण्यात आले, त्यात फिफा उपाध्यक्षांचादेखील समावेश आहे. उद्या येथे होणाऱ्या समारंभाची हे सर्व जण तयारी करीत होते. या सर्वांना अमेरिकेच्या सुपूर्द करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकूण १४ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून, त्यातील नऊ जण फुटबॉल अधिकारी असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. अन्य एका प्रकरणात स्वित्झर्लंड पोलिसांनी २०१८ च्या विश्वचषकाच्या यजमानपदाची धुरा रशियाला आणि २०२२ चे यजमानपद कतारला देण्यासंदर्भात चौकशीसाठी फिफा मुख्यालयातून फाइल्स तसेच ई मेल्स ताब्यात घेतले. या स्पर्धांसाठी २०१० साली फिफामध्ये मतदान झाले. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा आरोप होता. आयोजन स्थळ बदलण्याचा मात्र प्रश्नच नसल्याचे फिफाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.प्रवक्ते वॉल्टर डी ग्रेगोरियो म्हणाले,‘ब्लाटर यांचा या प्रकाराशी संबंध नाही. अध्यक्षपदाची निवडणूक पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार शुक्रवारी होईल. फुटबॉलमधील घाण संपविण्यासाठी हे सकारात्मक पाऊल असून आम्ही स्वागत करतो. हे पाचव्यांदा फिफा अध्यक्ष बनतील, असे मानले जात आहे. पण, या घटनेमुळे त्यांच्या बाजूने मतदान करणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यतादेखील आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ब्लाटर यांच्या विरोधात असलेले फिफा उपाध्यक्ष प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना ‘फुटबॉलसाठी दु:खद दिवस’ असे संबोधले. फिफाची प्रतिमा सुधारायची असेल, तर सध्याच्या नेतृत्वात बदल होणे आवश्यक असल्याची भूमिका प्रिन्स अली आणि युरोपियन फुटबॉल महासंघाच्या प्रमुखांनी घेतली. (वृत्तसंस्था)