शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर, वावरिंका सहज विजयासह दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: May 25, 2015 01:31 IST

कारकीर्दीतील ६४ व्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळत असलेला रॉजर फेडरर व त्याचा मायदेशातील सहकारी स्टेनिसलास वावरिंका यांनी रविवारी आपापल्या

पॅरिस : कारकीर्दीतील ६४ व्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळत असलेला रॉजर फेडरर व त्याचा मायदेशातील सहकारी स्टेनिसलास वावरिंका यांनी रविवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सहज विजयाची नोंद करीत आजपासून प्रारंभ झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.दुसरे मानांकन प्राप्त फेडररने कोलंबियाच्या अलेक्सांद्रो फालाचा ६-३, ६-३, ६-४ ने पराभव केला आणि रोला गॅरोवर आपल्या दुसऱ्या व एकूण १८ व्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदासाठी शानदार सुरुवात केली. फेडररचा फालाविरुद्ध सलग आठवा विजय आहे. फेडररला पुढच्या फेरीत स्पेनच्या मार्सेल ग्रनोलर्स व जर्मनीचा मॅथियास बाचिंगर यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.२०१२ चा चॅम्पियन फेडररने सेंटर कोर्टवर पाऊल ठेवल्यानंतर चाहत्यांनी त्याचे उभे राहून स्वागत केले. पहिल्या सेटमध्ये एकवेळ स्कोअर ३-३ असा बरोबरीत होता. पण त्यानंतर फेडररने सलग तीन गेम जिंकत पहिल्या सेटमध्ये सरशी साधली. फेडररने दुसऱ्या सेटमध्ये शानदार सुरुवात केली. तिसऱ्या गेममध्ये फालाची सर्व्हिस भेदली व त्यानंतर नवव्या गेममध्ये ब्रेक पॉर्इंट घेत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. फालाने तिसऱ्या सेटमध्ये संघर्षपूर्ण खेळ केला. उभय खेळाडूंदरम्यान ४-४ अशी बरोबरी होती. पण त्यानंतर फेडररने पुढील दोन्ही गेम जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाने तुर्कीच्या मार्सेल इलहानचा ६-३, ६-२, ६-३ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. पुरुष विभागातील अन्य सामन्यात २२ व्या मानांकित जर्मनीच्या फिलिप कोलश्रायबरने जपानच्या सोएदाचा ६-१, ६-०, ६-२ ने धुव्वा उडवला. पण रशियाच्या मिखाइल युज्नीला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. रोला गॅरोमध्ये २०१० ला उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या युज्नीने बोस्नियाच्या दामीर दजुमुर विरुद्धच्या लढतीत दोन सेट गमावल्यानंतर माघार घेतली. (वृत्तसंस्था)