शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर, नदाल, शारापोव्हाचा सहज विजय

By admin | Updated: July 1, 2015 02:58 IST

फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपद जिंकणारा स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंका, सात वेळचा विजेता रॉजर फेडरर, राफेल नदाल, जपानचा नंबर वन खेळाडू व पाचवा मानांकित केई

लंडन : फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपद जिंकणारा स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंका, सात वेळचा विजेता रॉजर फेडरर, राफेल नदाल, जपानचा नंबर वन खेळाडू व पाचवा मानांकित केई निशिकोरी, रशियाची मारिया शारापोव्हा आणि सध्याची महिला गटातील विजेती पेत्रा क्वितोव्हा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजय नोंदवीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित वावरिंकाने पोर्तुगालच्या जोओ सोसाला ६-२, ७-५, ७-६ असे पराभूत करून या वर्षीच्या आपल्या दुसऱ्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने आगेकूच केली. पाचव्या मानांकित निशिकोरीने इटलीच्या सिमोन बोलेलीला चुरशीच्या झालेल्या पाच सेटच्या लढतीत ६-३, ६-७, ६-२, ३-६, ६-२ असे पराभूत केले. महिलांच्या एकेरीत विजेतेपदाच्या शर्यतीत असलेली चौथी मानांकित रशियाची मारिया शारापोव्हाने बिगरमानांकित ब्रिटनच्या जोहाना कोंटाला सरळ दोन सेटमध्ये ६-२, ६-२ असे नमवीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे माजी नंबर वन आणि १६व्या मानांकित अमेरिकेच्या व्हीनस विलियम्सने आपल्या देशाच्या मॅडिसन ब्रेंग्लेचा ६-०, ६-० असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.(वृत्तसंस्था)महिला गटात दुसऱ्या मानांकित क्वितोव्हाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून नेदरलॅँडच्या मिकी बर्टन्सला ६-१, ६-० असा पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दोन वेळा विजेतेपद जिंकलेल्या क्वितोव्हाने आपल्या सर्व्हिसवर फक्त एक गुण गमावला. तिची दुसऱ्या फेरीत जपानच्या कुरुमी नाराविरुद्ध लढत होणार आहे. दुसरीकडे जर्मनीच्या एंजेली केरबरने आपल्याच देशाच्या कारिना विटहोफचा ४५ मिनिटांत ६-०, ६-० असा सहज पराभव केला. केरबरने या सामन्यात २१ विनर्स शॉट मारले. रॉजर फेडरर-दुसरा मानांकित रॉजर फेडररने पुरुष एकेरीत बोस्निया हर्जेगोविनाच्या दामिर गुमहुरचा एक तास सात मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-१, ६-३, ६-३ असा पराभव केला. त्याची पुढील लढत अमेरिकेच्या सॅम क्वेरीविरुद्ध होईल,-राफेल नदालला फेडररच्या तुलनेत एका तासापेक्षा जास्त वेळ कोर्टवर घालवावा लागला. या स्पर्धेत दहावे मानांकन असलेल्या नदालने ब्राझीलच्या थॉमस बेलुचीला ही लढत दोन तास दहा मिनिटे चाललेल्या लढतीत ६-४, ६-२, ६-४ असे पराभूत केले. नदालला आता अंतिम ३२ मध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनविरुद्ध खेळावे लागणार आहे.