शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

फेड- राफा एकत्र खेळणार

By admin | Updated: August 26, 2016 03:31 IST

माजी नंबर वन डेनिसपटू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल हे पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित लेवर चषक टेनिस स्पर्धेत दुहेरीत एकत्र खेळताना दिसतील.

प्राग : माजी नंबर वन डेनिसपटू स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल हे पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित लेवर चषक टेनिस स्पर्धेत दुहेरीत एकत्र खेळताना दिसतील. या स्पर्धेत युरोप आणि शेष विश्व संघांदरम्यान सामने खेळविले जातील. पुढील वर्षी २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा पहिल्यांदा येथे आयोजित होईल. लेवर चषकाचे अनावरण फेडरर- नदाल यांच्या उपस्थितीत न्यूयॉर्कमध्ये झाले. माजी ग्रॅण्डस्लॅम विजेता बोजोन बोर्ग आणि जॉन मॅकेन्रो यांना कर्णधार नेमण्यात आले. रॉड लेवर यांच्या नावे या स्पर्धेचे नाव लेवर चषक ठेवण्याची घोषणा आयोजकांनी केली. १९६९ मध्ये लेवर हे कॅलेंडर वर्षांत ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करणारे अखेरचे खेळाडू ठरले. नोवाक जोकोविच आणि आॅलिम्पिक सुवर्ण विजेता अ‍ॅण्डी मरे हे देखील स्पर्धेत खेळतील, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली. डेव्हिस चषक सेमीफायनलनंतर या नव्या स्पर्धेचे आयोजन होईल. ३५ वर्षांचा फेडरर म्हणाला,‘मी आणि नदाल सोबत खेळू यावर विश्वास बसत नाही.’ फेडररने १७ तर नदालने १४ ग्रॅण्डस्लॅम जिंकले आहेत. दोघांना दुहेरीत एकत्र खेळताना पाहण्याची अनेकांना उत्कंठा आहे. नदालने करिअरमध्ये फेडररविरुद्ध ३४ पैकी २३ सामने जिंकले. ३० वर्षांचा नदाल म्हणाला,‘ लेवर चषक आॅलिम्पिक संपल्यानंतरच्या वर्षी दरवेळी आयोजित करण्यात येईल. यात एकेरीचे तीन आणि दुहेरीचा एक असे दरदिवशी चार सामने खेळविले जातील. लेवर चषकात युरोपियन संघात सध्याच्या रँकिंगनुसार खेळाडूंची निवड होईल. सध्या जागतिक टेनिसमधील २० अव्वल खेळाडूंमध्ये पाच जण बिगर युरोपियन आहेत. युरोपाबाहेर कॅनडाचा मिलोस राओनिक हा सहाव्या स्थानावरील खेळाडू आहे. मिलोस विम्बल्डनचा उपविजेता देखील आहे.(वृत्तसंस्था)