शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

अंजली भागवत, सुमा शिरुरची नेमबाजीच्या प्रशिक्षकांविरोधात खोटी तक्रार ?

By admin | Updated: August 7, 2015 12:38 IST

ख्यातनाम नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरुरने नेमबाजीचे प्रशिक्षक स्टॅनिस्लाव्ह लॅपिडस यांच्याविरोधात महिला खेळाडूंशी गैरवर्तन केल्याची खोटी तक्रार केल्याचा दावा संघटनेने केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि.  ७ - ख्यातनाम नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरुरने नेमबाजीचे प्रशिक्षक स्टॅनिस्लाव्ह लॅपिडस यांच्याविरोधात महिला खेळाडूंशी गैरवर्तन केल्याची खोटी तक्रार केल्याचे नमूद करत नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) लेपिडस यांना क्लीन चिट दिली आहे. 
भारतीय नेमबाजीतील महिला खेळाडू अंजली भागवत, सुमा शिरुर, आयोनिका पॉल, कुहेली गांगुली, तेजस्विनी सावंत, लज्जा गोस्वामी यांनी नेमबाजीचे प्रशिक्षक लॅपिडस यांच्याविरोधात संघटनेकडे तक्रार केली होती. लॅपिडस यांनी कनिष्ठ महिला नेमबाजांकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचे या तक्रारीत म्हटले होते.  यात भर म्हणजे खासगी प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देत लॅपिडस यांनी काही ज्यूनिअर महिला खेळाडूंसोबत शारीरीक संबंधही ठेवले असा धक्कादायक आरोप ऑलिम्पिक खेळाडू संजीव राजपूत यांनी केला होता. या प्रकरणामुळे नेमबाजी विश्वात एकच खळबळ उडाली होती.  एनआरएआयने या प्रकरणाची चौकशी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले नाही असे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले.  काही खेळाडूंनी जाणूनबुजून संघटनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे असा आरोप एनआरएआयचे प्रमुख राणिंदर सिंह यांनी केला आहे. 'भागवत व अन्य खेळाडूंनी आम्हाला लॅपिडस यांच्याविरोधात एकही पुरावा दिला नाही. याऊलट रागाच्या भरात ही तक्रार नोंदवली अशी कबुलीच भागवते दिल्याचे सिंह यांनी एका वृत्तपत्राला सांगितले आहे. लॅपिडस हे कडक शिस्तीचे प्रशिक्षक असून त्यांचे काही खेळाडू व संजीव राजपूत यांच्यासोबत वादही झाले होते अशी माहिती आता समोर आली आहे. 
खेळाडूंच्या तक्रारीनंतर परदेशी प्रशिक्षक लॅपिडस यांना धक्काच बसला, त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र सध्या तेच भारताचे प्रशिक्षक असतील असे सिंह यांनी सांगितले. दरम्यान, एनआरएआयने हे प्रकरण सखोल चौकशीसाठी अॅथेलेटिक्स संघटनेकडे सोपवले आहे.