शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन काळात उपोषणाला बसणार

By admin | Updated: February 23, 2017 01:01 IST

केरळ येथे जानेवारी २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या रोख रकमेची पारितोषिके

पुणे : केरळ येथे जानेवारी २०१५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या रोख रकमेची पारितोषिके शासनाकडून अनेक वेळा अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून आणि पत्रव्यवहार करून मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. पारितोषिकांच्या रकमेसाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. मुंबईत उपोषणाला बसण्यासंदर्भाची अशी चर्चा कार्यकारिणीच्या बैठकीत झाली असल्याची माहिती महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली. या वेळी एमओएच्या निवडणुकीची तारीख २५ मार्च निश्चित करण्यात आली.महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेची बैठक निसर्ग मंगल कार्यालयात आज (बुधवारी) पार पडली. या वेळी अध्यक्ष अजित पवार, खजिनदार धनंजय भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत, प्रकाश तुळपुळे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. केरळ राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंच्या पारितोषिकांच्या रकमेचा विषय पुढे आल्यावर त्यावर चर्चा होऊन खेळाडूंनी तरी त्यांच्या हक्काच्या पारितोषिकांसाठी किती महिने वाट पाहायची? तो त्यांचा हक्क आहे. आपले राज्य पदकविजेत्यांना इतर राज्यांपेक्षा कमी रक्कम देते आणि तीसुद्धा वेळेवर मिळत नाही, अशी तक्रार काही सदस्यांनी अध्यक्षांकडे केली. तेव्हा अध्यक्ष म्हणाले, ‘‘आपल्या राज्यात अनेक गुणवान खेळाडू आहेत. खरे तर आपण क्रीडामंत्र्यांबरोबरसुद्धा या संदर्भात अनेक वेळा चर्चा केली आहे. क्रीडा खात्यातील अधिकाऱ्यांबरोबरसुद्धा बोलणे झाले आहे. एवढे होऊनही जर रक्कम मिळत नसेल, तर खेळाडूंच्या हक्कासाठी आपण सर्व मिळून पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उपोषणाला बसू.’’ निवडणुकीसंदर्भात लांडगे म्हणाले, ‘‘दर ४ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी २५ मार्च  ही तारीख निश्चित करण्यात  आली. (क्रीडा प्रतिनिधी)