शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

पुजारा-साहा जोडीचा धमाका, भारत सुस्थितीत

By admin | Updated: March 19, 2017 13:02 IST

चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहा जोडीने सातव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 132 धांवाच्या भागिदारीच्या जोरावर तिसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे.

ऑनलाइन लोकमतरांची, दि. 19 - चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहा जोडीने सातव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 132 धांवाच्या भागिदारीच्या जोरावर तिसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात साहा व पुजारा यांनी संयमी फलंदाजी करीत भारताच्या डावाला आकार दिला. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात 466 धावा केल्या आहेत. भारताकडे 15 धावांची आघाडी असून साहा 76 आणि पुजारा 175 धावांवर खेळत आहे. भारताने आज 6 बाद 360 धावांवरुन खेळायला सुरुवात केली. पहिल्या सत्रात भारताने75 केल्या असल्या तरी या सत्रात भारताने एकही फलंदाज गमावलेला नाही. पुजारा आणि साहा यांनी जबाबदारीने फलंदाजी केली असून शतकी भागिदारी रचली आहे. भारताने कालच्या १ बाद १२० धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारतीय डावात पुजाराने सूत्रधाराची भूमिका बजावली. पुजाराने ११ वे कसोटी शतक झळकावले तर कर्णधार विराट कोहली ६ धावा काढून बाद झाला.भारतीय संघाला फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी केवळ २४० धावा फटकावता आल्या. पुजाराने ६ तास ५२ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकताना ३२८ चेंडूंना सामोरे जात १७ चौकार लगावले. दुसऱ्या टोकाकडून रिद्धिमान साहा याने १८ धावा फटकावल्या. अखेरच्या सत्रात हेजलवुडने करुण नायरला (२३) बाद करीत आॅस्ट्रेलियाला यश मिळवून दिले. नायरने पुजारासोबत ४४ धावांची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने आर. आश्विनला (३) माघारी परतवले. त्यानंतर साहा व पुजारा यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला.