शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाक-बांगलादेश रंगतदार लढतीची अपेक्षा

By admin | Updated: March 2, 2016 02:54 IST

सलग दोन लढतीत विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या बांगलादेश संघाला आशिया कप राऊंड रॉबिन लढतीत बुधवारी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

मीरपूर : सलग दोन लढतीत विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या बांगलादेश संघाला आशिया कप राऊंड रॉबिन लढतीत बुधवारी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानविना खेळावे लागणार आहे, तरी यजमान संघाविरुद्ध पाकिस्तानसाठी विजयाचा मार्ग सोपा नाही. आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेपूर्वी खेळल्या जाणाऱ्या उपखंडातील संघांदरम्यानच्या या स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाक व बांगलादेश या संघांना या लढतीत विजय आवश्यक आहे.मशर्रफी मुर्तजा व त्याचा संघ या लढतीत विजय मिळवित आपल्या टीकाकारांना गप्प करण्यास प्रयत्नशील आहेत. त्याचसोबत या लढतीत विजय मिळवला, तर विश्व टी-२० पूर्वी त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळणार आहे. मुस्तफिजुरची दुखापत यजमान संघासाठी चिंतेचा विषय आहे. या वेगवान गोलंदाजामध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजण्याची क्षमता आहे. पाकिस्तानला यूएईविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळविताना संघर्ष करावा लागला होता. सीनिअर सलामीवीर तमिम इक्बाल संघात परतणे बांगलादेश संघासाठी चांगले वृत्त आहे. तमिमकडून बांगलादेश संघाला आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता भारताविरुद्ध पहिल्या लढतीत पाकिस्तान संघाला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. पाकिस्तान संघाचा डाव केवळ ८३ धावांत संपुष्टात आला होता, तर यूएईविरुद्ध त्यांचे तीन फलंदाज केवळ १७ धावांत माघारी परतले होते. सलामीवीर शारजील खान व मोहम्मद हफीज यांना नैसर्गिक फलंदाजी करण्यासाठी कुठली अडचण येत आहे, हे अद्याप कळले नसल्याचे पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी कबूल केले आहे. प्रशिक्षकांनी अनुभवी खेळाडू शोएब मलिकची प्रशंसा केली. मलिकने यूएईविरुद्ध सोमवारी नाबाद ६३ धावांची खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मोहम्मद आमिरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत आमिरची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. आमिरने वेगवान स्विंग माऱ्याच्या जोरावर भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले, तर यूएईविरुद्ध त्याने चार षटकांत केवळ ६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. आमिरला सीनिअर गोलंदाज मोहम्मद समीकडून चांगली साथ मिळेल, अशी अपेक्षा आहे. उंच चणीचा गोलंदाज मोहम्मद इरफानच्या चेंडूला उसळी मिळत आहे, पण त्याच्या गोलंदाजीमध्ये भेदकता नाही. पाक संघव्यवस्थापन फिरकीपटू मोहम्मद नवाजला संधी देणार की अनुभवी वेगवान गोलंदाज वहाब रियाज संघात परतणार, याबाबत उत्सुकता आहे.(वृत्तसंस्था)