शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

इंग्लंडचे पारडे जड

By admin | Updated: June 14, 2017 03:46 IST

पाकिस्तानविरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बुधवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत यजमान इंग्लंडचे पारडे वरचढ भासत आहे.

कार्डिफ : पाकिस्तानविरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बुधवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य लढतीत यजमान इंग्लंडचे पारडे वरचढ भासत आहे. इंग्लंड संघ ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आयसीसीच्या स्पर्धेत पहिले जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहे. तीनवेळा विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या इंग्लंडला गेल्या ४२ वर्षांत ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये जेतेपद पटकावता आलेले नाही. इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघ समतोल भासत असून, या वेळी जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पहिल्या लढतीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाने दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली २०१५ मध्ये आयोजित विश्वकप स्पर्धेत पहिल्या फेरीत गाशा गुंडाळणाऱ्या इंग्लंड संघाने त्यानंतर कामगिरीत चांगली सुधारणा केली. गेल्या वर्षी त्यांनी मायदेशात खेळताना पाकिस्तानचा वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने पराभव केला, त्यात ट्रेंटब्रिजमध्ये फटकावलेल्या विश्वविक्रमी ४४४ धावसंख्येचा समावेश होता. पाक आव्हान देणार का? आतापर्यंत इंग्लंड स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे. त्यांनी एकही लढत गमावलेली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तानने कर्णधार सरफराज अहमदच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयामुळे पाक संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. सोमवारी झालेल्या पराभवासाठी श्रीलंका संघ स्वत:च जबाबदार आहे. श्रीलंका संघाचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. सलामीवीर फखर जमानने श्रीलंकेविरुद्ध ३६ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची खेळी केली. पण मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर, जुनेद खान, हसन अली व फहीम खान यांनी छाप सोडली आहे. हे ठरतील ‘मॅच विनर’बेन स्टोक्सच्या रूपाने इंग्लंडकडे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तो फलंदाजी व गोलंदाजीमध्ये कुठल्याही संघाविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये २० लाख डॉलरची विक्रमी किंमत मिळाली होती. जो रुटही विश्वदर्जाचा फलंदाज असून तो फॉर्मातही आहे. मधल्या फळीतील मोर्गन व जोस बटलर आहेत, तर सलामीला एलेक्स हेल्स व जेसन रे संघाला चांगली सुरुवात करून देत आहेत. वेगवान गोलंदाजांमध्ये जॅक बॉल व लियाम प्लंकेट यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, तर मार्क वूडने स्ट्राईक बॉलर म्हणून कर्णधार मॉर्गनचा विश्वास सार्थ ठरविला आहे. टाचेवर तीनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर वूड संघात परतला आहे. त्याचा वेग तसूभरही कमी झालेला नाही. उभय संघ यातून निवडणारइंग्लंड : इयॉन मोर्गन(कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, अ‍ॅलेक्स हेल्स, जोश बटलर, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टीव्हन फिन.पाकिस्तान : सर्फराज अहमद(कर्णधार), अहमद शहजाद, अजहर अली, बाबर आजम, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, जुनैद खान, मोहम्मद आमिर , मोहम्मद हफीज, शादाब खान,शोएब मलिक.