मुंबई: मुंबईमध्ये सुरु असलेल्या 2क्व्या आशियाई ज्युनियर टेबल टेनिस स्पर्धेच्या मुला-मुलींच्या कॅडेट आणि मुलींच्या ज्युनियर गटात भारतीय संघाला उपांत्यपुर्व फेरीत हार पत्करावी लागल्याने या गटातील यजमान भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले.
वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ओफ इंडिया (एनएससीआय) येथे सुरु
असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या ज्युनियर
गटाच्या उपांत्यपुर्व सामन्यात भारतीयांना हाँगकाँग विरुध्द 1-3 असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला मुलांच्या कॅडेट गटात देखील भारताच्या पदरी निराशाच आली. या गटादेखील द. कोरियाच्या संघाने भारतीय संघाविरुध्द एकहाती वर्चस्व राखताना 3-क् अशी सहज बाजी मारली.
दरम्यान कोरिया संघाने मुलांच्या कॅडेट गटात धक्कदायक निकाल लावताना गतविजेत्या चीनला नमवताना अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी त्यांना चायनीज तैपईशी लढत द्यावी लागेल. (क्रीडा प्रतिनिधी)