शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात; इंग्लंड 40 धावांनी विजयी

By admin | Updated: June 10, 2017 23:38 IST

बेन स्टोक्स आणि इयॉन मॉर्गन यांनी केलेल्या झंझावाती भागीदारीच्या जोरावर आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 40 धावांनी मात केली.

ऑनलाइन लोकमत
बर्मिंघम, दि. 10 - दोन वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचे आयसीसी चँपियन्स ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आले आहे. शतकवीर बेन स्टोक्स आणि  इयॉन मॉर्गन यांनी केलेल्या झंझावाती भागीदारीच्या जोरावर आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 40 धावांनी मात केली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची तीन बाद 35 अशी अवस्था झालेली असताना स्टोक्स आणि मॉर्गन यांनी जबरदस्त फलंदाजी करून इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करून दिले. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी झाली. दरम्यान, मॉर्गन 87 धावांवर धावबाद झाला. मात्र स्टोक्सने आपले शतक पूर्ण करत बटलरच्या साथीने इंग्लंडला विजयासमीप नेले.  इंग्लंडची 40.2 षटकात चार बाद 240 अशी परिस्थिती असताना पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसामुळे पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार इंग्लंडचा 40 धावांनी विजय घोषित करण्यात आला.  
तत्पूर्वी,   "करो वा मरो" अशी स्थिती असलेल्या लढतीत आरोन फिंच व स्टीव्हन स्मिथ यांची अर्धशतके आणि अखेरच्या षटकांमध्ये ट्रेव्हिस हेडने फटकावलेल्या 71 धावा यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 278 धावांचे आव्हान ठेवले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर डेव्हिड वॉर्नरच्या (21) रूपात ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. पण फिंच (68) आणि स्मिथ (56) यांनी 96 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाची पायाभरणी केली.
मात्र, फिंच आणि स्मिथ बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. मार्क वूड आणि आदिल रशिद यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. पण ट्रेव्हिस हेडने (नाबाद 71) एक बाजू लावून धरत संघाला 50 षटकात 9 बाद 277 धावांपर्यंत मजल मारून दिली.इंग्लंडकडून मार्क वूड आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी चार बळी टिपले.
दरम्यान, आयसीसी चँपियन्स ट्रॉफीत आता  इंग्लंड आणि बांगलादेशचा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.