शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

एलिट गट फुटबॉल स्पर्धा

By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST

यंग मुस्लिम क्लबचा यंग इक्बालवर ३-१ ने विजयएलिट गट फुटबॉल स्पर्धा नागपूर: यंदाच्या मोसमात विजयी घोडदौड करणाऱ्या यंग मुस्लिम संघाने गतउपविजेता यंग इक्बाल संघाचा शुक्रवारी एलिट गट फुटबॉल स्पर्धेच्या साखळीत ३-१ ने पराभव केला. मेघे ग्रूप प्रायोजित ही स्पर्धा नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेने दपूम रेल्वेच्या मोतीबाग मैदानावर आयोजित करण्यात ...


यंग मुस्लिम क्लबचा यंग इक्बालवर ३-१ ने विजय
एलिट गट फुटबॉल स्पर्धा
नागपूर: यंदाच्या मोसमात विजयी घोडदौड करणाऱ्या यंग मुस्लिम संघाने गतउपविजेता यंग इक्बाल संघाचा शुक्रवारी एलिट गट फुटबॉल स्पर्धेच्या साखळीत ३-१ ने पराभव केला. मेघे ग्रूप प्रायोजित ही स्पर्धा नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेने दपूम रेल्वेच्या मोतीबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
यंग मुस्लिम संघाचा हा दुसरा विजय ठरला. आधीच्या सामन्यात त्यांनी दपूम रेल्वेचा पराभव केला तर शहर पोलीस संघाविरुद्ध सामना बरोबरीत सोडविला होता. मध्यंतरापर्यंत यंग मुस्लिम १-० ने पुढे होता. शाहबाज पठाण याने हा गोल नोंदविला.यानंतर यंग इक्बालच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण यंग मुस्लिमच्या बचावफळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.
उत्तरार्धातील खेळात शोएब रिझवान याने ४९ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी दुपट्ट केली. यंग मुस्लिमचा तिसरा गोल नावेद अख्तर याने ७२ व्या मिनिटाला नोंदविला. चार मिनिटानंतर मोहम्मद इक्बाल याने यंग इक्बालकडून गोल नोंदवित पराभवाचे अंतर कमी केले. सामन्यात नियमबाह्य खेळ केल्याबद्दल यंग मुस्लिमचा इम्रान खान याला रेफ्रीने ९० व्या मिनिटाला तंबी दिली. उद्या शनिवारी रब्बानी क्लब आणि रेंज पोलीस संघ यांच्यात दुपारी ३.४५ पासून सामना खेळला जाईल. (वृत्तसंस्था)