रिओ दि जेनेरिओ : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ‘ई’ गटातील लढतीत इक्वाडोर संघ फ्रान्सविरुद्ध विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आह़े दुसरीकडे फ्रान्स संघ आपले विजयी अभियान कायम राखून आपल्या गटात टॉपवर पोहोचण्यासाठी खेळेल़
स्पर्धेत इक्वाडोर आणि स्वित्ङरलड यांचे समान गुण आहेत;मात्र गोलच्या सरासरीत स्वित्ङरलड संघ पुढे आह़े या गटातील अन्य संघ होंडूरासला अद्याप आपले खातेही उघडता आलेले नाही़
‘ई’ गटात 6 गुणांसह आघाडीवर असलेल्या फ्रान्सला इक्वाडोर विरुद्धचा सामना केवळ ड्रॉ करण्याची गरज आह़े अशी कामगिरी केल्यास या संघाला पुढच्या फेरीच्या लढतीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ अर्जेटिनाशी भिडावे लागणार नाही़ फ्रान्स संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आह़े त्यांनी आपल्या पहिल्या लढतीत होंडूरासवर 3-क् ने आणि दुस:या सामन्यात स्वित्ङरलडचा 5-2 ने धुव्वा उडविला होता़ फ्रान्सला 2क्1क् च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता़ त्या वेळी संघातील खेळाडूंनी प्रशिक्षकांविरुद्ध आवाज उठविला होता़ त्यानंतर प्रशिक्षक दिदिएर डॅसचॅप्स यांनी फ्रान्स संघावर गत चार वर्षात बरीच मेहनत घेतली आह़े
इक्वाडोरला साखळी फेरीतील पहिल्या लढतीत स्वित्ङरलडकडून 1-ने मात खावी लागली होती़ मात्र, दुस:या लढतीत त्यांनी होंडूरावर 2-1 ने सरशी साधली होती़ त्यामुळे या लढतीत विजय मिळाल्यास इक्वाडोरच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा अद्यापही कायम आहेत़ या दोन्ही देशांत पहिला सामना 2क्क्8 मध्ये झाला होता़ त्या लढतीत फ्रान्सने 2-क् असा विजय संपादन केला होता़ (वृत्तसंस्था)