श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या व निर्णायक टी-२० सामन्यात चमकदार कामगिरी करीत, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. अश्विन म्हणाला,‘संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावण्यास प्रयत्नशील असतो. कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.’ रविचंद्रन अश्विनने रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत ८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. अश्विन सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अश्विन म्हणाला,‘मला पाच बळी घेता येतील, असे वाटत होते. खेळपट्टी अनुकूल होती. चेंडूला उंची देण्यास प्रयत्नशील असतो. त्याचा मला लाभ झाला.’ (वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}