शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी पलटणचा ‘बुल्स’ला दणका

By admin | Updated: February 15, 2016 03:25 IST

घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवताना पुणेरी पलटणने बंगळुरु बुल्सला २९-२७ असा धक्का देत प्रो कबड्डीच्या गुणतालिकेत १९ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली

पुणे : घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवताना पुणेरी पलटणने बंगळुरु बुल्सला २९-२७ असा धक्का देत प्रो कबड्डीच्या गुणतालिकेत १९ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली. त्याचवेळी याआधी झालेल्या सामन्यात यू मुंबाने दणदणीत बाजी मारताना बंगाल वॉरियर्सचे तगडे आव्हान ३२-२१ असे सहजरीत्या परतावून इतर संघांना धोक्याचा इशारा दिला.बंगळुरुने अपेक्षित आक्रमक सुरुवात केल्यानंतर पुणेकरांनी सामन्यात बरोबरी साधून बंगालवर आघाडी घेतली. यावेळी पुण्याने चढाई व पकडीमध्ये चमक दाखवत मध्यंतराला १८-१० अशी आघाडी घेतली. यानंतर बंगळुरुने जबरदस्त पुनरागमन केले. अखेरच्या मिनिटाला पुण्याकडे एका गुणाची आघाडी असताना कर्णधार मनजीत चिल्लरने निर्णायक यशस्वी चढाई करुन संघाच्या विजयावर शिक्का मारला. लक्षवेधी खेळ केलेल्या चिल्लरला सुरेंद्र सिंगच्या खोलवर चढायांची साथ मिळाली. आशिष सांगवान व श्रीकांत तेवठीया बंगळुरुचा पराभव टाळण्यात अपयशी ठरले.तत्पूर्वी यू मुंबाने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या बंगाल वॉरियर्सचा ३२-२१ असा पाडाव केला. संघातील चार प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत गतविजेता यू मुंबा अडचणीत येणार, अशी चर्चा होती. मात्र रिशांक देवाडिगाने आक्रमणाची सर्व सूत्रे स्वत:कडे घेत बंगाल वॉरियर्सचे तगडे आव्हान परतविण्यात मोलाचे योगदान दिले. रिशांकने १० गुणांची कमाई करून बंगालच्या आव्हानातली हवा काढली. मध्यंतरानंतर यू मुंबाने बंगालवर दोन लोण चढवले. २८व्या मिनिटाला १६-१६ अशी बरोबरी असताना मुंबईने तुफान खेळ करून ३०-२० अशी भक्कम आघाडी घेत विजय स्पष्ट केला. रिशांकच्या आक्रमक व खोलवर चढाया आणि जीवा कुमार, फझल अत्राचली यांच्या दमदार पकडी मुंबईच्या विजयात निर्णायक ठरल्या.(क्रीडा प्रतिनिधी)