शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

करचुकवल्यामुळे मेस्सीव्यतिरिक्त अटक झालेले खेळाडू

By admin | Updated: July 6, 2016 23:02 IST

मेस्सीला २० लाख युरोचा दंडही ठोठावला आहे. अटक होणारा मेस्सी हा पहिलाच खेळाडू नाही, यापुर्वीही करचुकवल्यामुळे खेळांडूना अटक केली आहे. तर जाणून घेऊ कोण आहेत हे खेळाडू.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ : कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये बार्सिलोना न्यायालयाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांना २१ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर मेस्सीला २० लाख युरोचा दंडही ठोठावला आहे. अटक होणारा मेस्सी हा पहिलाच खेळाडू नाही, यापुर्वीही करचुकवल्यामुळे खेळांडूना अटक केली आहे. तर जाणून घेऊ कोण आहेत हे खेळाडू. 

 

लेस्टर पिगेटइंग्लंडचा व्यावसायीक घोडेस्वार लेस्टर पिगेट याला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९७० ते १९८५ या काळात त्याने आपले सुमारे २० मिलीयन पौंडाच्या उत्पन्नाचे विवरण योग्य रित्या न दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. या आरोपात त्याला इस्पिच क्राऊ़न कोर्टाने ही शिक्षा सुनावली होती. लेस्टर याने तीस लाख पौंडांचा कर चुकवला होता. ही रक्कम त्याने सिंगापूर, स्वित्झरलॅण्ड, बहामस आणि केमन आयलँम्ण्ड येथील बँकांत ठेवल्याचे तपासात समोर आले होते.

(लिओनेल मेस्सीला २१ महिने कारावास)

बोरीस बेकर२००२ मध्ये लाखो युरोंचा कर चुकवल्या प्रकरणी जर्मनीचा टेनिस स्टार बोरीस बेकर याला म्युनिच न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्याला न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. कर चुकवेगिरी केल्याचे बोरीस बेकर याने मान्यही केले होते. त्याबदल्यात त्याने तीन मिलीयन युरो एवढी रक्कम कर आणि त्याचे व्याज या स्वरुपात दिली होती. १९९१ ते १९९३ या काळात १.७ मिलीयन युरोचा कर चुकवला होता. यानंतर १९९९ मध्ये बेकरने निवृत्ती स्विकारली.पेट रोज अमेरिकन बेसबॉल खेळाडू आणि सिनसिनाटी रेड स्टार पेट रोज याने कर चुकवेगिरी केल्या प्रकरणी त्याला २० एप्रिल १९९० ला दोषी ठरवण्यात आले. त्याने विविध मार्गातून मिळवलेल्या उत्पन्नाचे विवरण दिले नव्हते. त्याला ५० हजार डॉलरचा दंड ठोठावला होता. त्यानंतर जानेवारी १९९१ मध्ये चुकवलेला कर आणि त्यावरील व्याज यासाठी ३ लाख ६६ हजार ४१ डॉलरची रक्कम भरल्यावर मुक्त करण्यात आले. मात्र त्याला १ हजार तास कम्युनिटी सर्व्हिस देण्याची शिक्षा देण्यात आली.