शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

महाराष्ट्राच्या मैदानी खेळास डोपिंगचा डाग

By admin | Updated: April 20, 2016 03:30 IST

महाराष्ट्राची मूळची नागपूरची असलेली लांब पल्ल्याची धावपटू रोहिणी राऊत नॅशनल अ‍ॅँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) २८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत प्रथमदर्शनी

पुणे : महाराष्ट्राची मूळची नागपूरची असलेली लांब पल्ल्याची धावपटू रोहिणी राऊत नॅशनल अ‍ॅँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) २८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत प्रथमदर्शनी दोषी आढळली असल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या २६ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याचे पडसाद नक्की उमटणार असल्याची चर्चा अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात सुरू झाली आहे. या सभेत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता राज्यातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसह पालक, मार्गदर्शक व संघटकांचे लक्ष लागले आहे. रियो आॅलिम्पिक डोळ्यांसमोर ठेवून देशभरात यंदाच्या वर्षी झालेल्या विविध मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या धावपटूंची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचे नाडाने ठरविले. विजेते धावपटू ज्या शहरात सराव करतात, तेथे अचानक जाऊन विजेत्या धावपटूंचे चाचणीसाठी युरीन नमुने घेतले गेले. २३ मार्च २०१६ रोजी नाडाने रोहिणी राऊत हिला पहिल्या चाचणीत दोषी आढळल्याची नोटीस पाठवली आहे. (हे पत्र नाडाने अ‍ॅथलेटिक्स महासंघ व राज्य संघटनेलासुद्धा पाठवले आहे.) नाडाने या पत्रात असे म्हटले आहे, की २८ फेब्रुवारी रोजी नाडा डोपिंग कंट्रोल आॅफिसर (डीसीओ) आपल्याकडून युरीनचे दोन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. दोन्ही नमुने आपल्यासमोरच वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये सीलबंद करण्यात आले होते. त्यामध्ये ए नमुन्यातमध्ये १९ नोरॉन्ड्रोस्टेरोन (अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईड) हे उत्तेजक द्रव्य (खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करणारे) आढळले आहे आणि त्याचे प्रमाण १२ एनजी/एमएल (नॅनोग्रॅम/मिलिलिटर) एवढे आहे, की जे प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. प्रत्येकाच्या शरीरात २.५ एनजी/एमएल एवढे असतेच. त्यामुळे आपल्यावर बंदीची कारवाई का करू नये, असेसुद्धा या पत्रात म्हटले आहे. या पत्रात असेसुद्धा नमूद केले आहे, की जर या प्रकरणारत आपल्याला काही आपले म्हणणे मांडायचे असेल, तर ही नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसांच्या आत (कामकाजाचे दिवस) आपले म्हणणे लेखी स्वरूपात द्यावे. महाराष्ट्राची पहिलीच अ‍ॅथलीट उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे देशात लांब पल्ल्याच्या शर्यतीत एक वेगळा दबदबा निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या धावपटूंना मान खाली घालण्याची वेळ येणार आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या २६ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबत काय निर्णय घेण्यात येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. या सभेसाठी राज्यातील सर्व जिल्हा संघटनांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी महासंघ व राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवालासुद्धा उपस्थित राहणार आहेत. राज्य संघटना रोहिणी राऊतविरुद्ध काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष राहील.(क्रीडा प्रतिनिधी)