शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नायकाला ‘खलनायक’ संबोधूू नका!

By admin | Updated: June 27, 2015 00:54 IST

बांगलादेशविरुद्ध मालिका गमाविल्यानंतर महेंद्रसिंह धोनीवर टीकेची झोड उठली. यावर पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने धोनीची बाजू घेतली

कोलकाता : बांगलादेशविरुद्ध मालिका गमाविल्यानंतर महेंद्रसिंह धोनीवर टीकेची झोड उठली. यावर पाक टी-२० संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने धोनीची बाजू घेतली. भारतीय वन डे कर्णधाराला एक मालिका गमाविल्यामुळे खलनायक संबोधू नका, असे त्यांनी भारतीय क्रिकेटशौकिनांना आवाहन केले.एका पराभवानंतर आवडत्या खेळाडूवर टीकेचा भडिमार करणे ही भारतीय उपखंडाची परंपरा असल्याचे संबोधून आफ्रिदी म्हणाला,‘बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर धोनीसोबत जो व्यवहार होत आहे, ते पाहून मला वाईट वाटले. एखादा वाईट पराभव आपल्या आवडत्या खेळाडूला खलनायक बनवून जातो, ही भारतीय उपखंडातील परंपरा संपायला हवी. खराब चित्र निर्माण करण्यासाठी मीडियादेखील जबाबदार आहे.’ आफ्रिदीलादेखील त्याच्या देशात अनेकदा अशा प्रकारच्या अपमानास्पद वागणुकीस सामोरे जावे लागले. कर्णधाराच्या कामगिरीचे आकलन करा; पण त्याच्या मागच्या कामगिरीकडेही लक्ष द्या. याआधी देशाला या व्यक्तीने किती सन्मान मिळवून दिला, हे विसरू नका. धोनी भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. त्याचा रेकॉर्ड सर्व काही कथन करतो.’भविष्यातील भारतीय संघ बांधण्याचे श्रेय धोनीला जाते, असे सांगून आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘धोनीने बांधलेला भविष्यातील भारतीय संघ बलाढ्य आहे. या संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत.’ पाककडून यापुढे केवळ टी-२० क्रिकेट खेळणारा आफ्रिदी संघाच्या भविष्याबाबत आशावादी दिसला. तो म्हणाला, ‘अलीकडे काही वर्षांत पाकच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सुधारणा झाली. त्यामुळेच राष्ट्रीय संघासाठी चांगले खेळाडू मिळत आहेत. आमचा संघ काही वर्षांत आणखी चांगला होईल.’ (वृत्तसंस्था)