शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविचची विजयी कूच

By admin | Updated: July 4, 2015 01:49 IST

सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आॅस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिंक याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत आगेकूच केली.

लंडन : सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आॅस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिंक याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत आगेकूच केली. फ्रेंच ओपन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने आपली शानदार कामगिरी कायम ठेवताना स्पेनच्या फर्नांडो वर्डास्को याचा एक तास ५३ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-४, ६-३, ६-४ असा पराभव केला. त्याला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी बेल्जियमच्या डेव्हिड गोफिन याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.वावरिंकाने अतिशय नियोजनबद्ध खेळ केला आणि प्रत्येक सेटमध्ये प्रत्येकी एका वेळेस प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस तोडताना सरळ सेटस्मध्ये आपला विजय निश्चित केला. वर्डास्कोलादेखील चार वेळेस ब्रेक पॉइंटची संधी मिळाली; परंतु स्वीस खेळाडूने प्रत्येक वेळी आपली सर्व्हिस वाचवण्यात यश मिळवले. तुलनेत वावरिंकाला सामन्यात १६ वेळेस ब्रेक पॉइंटची संधी मिळाली आणि त्यात तो तीन वेळेस यशस्वी ठरला.वर्डास्कोचे त्याच्या सर्व्हिसवर नियंत्रण नव्हते, त्यामुळे वावरिंकाचे काम सोपे झाले. स्पॅनिश खेळाडूने एकूण १२ वेळेस दुहेरी चुका केल्या. वावरिंकाच्या धारदार सर्व्हिसचेही त्याच्याकडे उत्तर नव्हते. स्वीस खेळाडूने १४ वेळेस बिनतोड सर्व्हिस केल्या, तर वर्डास्कोला सहा वेळेस बिनतोड सर्व्हिस करता आली.दरम्यान, २६ वा मानांकित निक किर्गियोसने तिसऱ्या फेरीत कॅनडाच्या राओनिक याचा ५-७, ७-५, ७-६, ६-३ असा पराभव केला. राओनिकने गेल्या वर्षी किर्गियोसला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते. किर्गियोसने या पराभवाचा हिशेब चुकता केला.गेल्या वर्षी राफेल नदालला पराभूत करीत सनसनाटी निर्माण करणाऱ्या किर्गियोसची पुढील फेरीतील लढत २१ व्या मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटशी होईल.