लंडन : गत चॅम्पियन अॅण्डी मरे व उपविजेता नोव्हाक जोकोव्हिच यांना यंदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेत एकाच ‘हाफ ’ मध्ये स्थान मिळाले आहे. त्याचा सर्वात अधिक लाभ रॉजर फेडररला मिळणार आहे. ब्रिटनसाठी गेल्या वर्षी 77 वर्षात प्रथमच विम्बल्डनचे जेतेपद पटकावून देणा:या मरेला यंदा उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोव्हिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
सातवेळा विजेतेपदाचा मान मिळविणा:या चौथ्या मानांकित फेडररची गाठ उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालसोबत पडण्याची शक्यता आहे. 2क्क्8 व 2क्1क् मध्ये जेतेपद पटकाविणा:या नदालला यंदा दुसरे मानांकन देण्यात आलेले आहे, कारण त्याला 2क्13 मध्ये पहिल्या फेरीत तर 2क्12 मध्ये दुस:या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. या महिन्यात विक्रमी नवव्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकाविणा:या स्पेनच्या 28 वर्षीय नदालने स्पर्धेबाबत चिंता व्यक्त केली आहे. नदाल म्हणाला,‘ग्रासकोर्टवर 2 आठवडे रंगणा:या या स्पर्धेत माङो गुडघे साथ देतील किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.’
नदालसाठी ड्रॉ विशेष सुकर नाही. त्याला दुस:या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोलच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. रोसोलने 2क्12 मध्ये नदालचा पराभव केला होता. नदलाची पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिजानसोबत गाठ पडणार आहे तर तिस:या फेरीत त्याची लढत इव्हो कालरेव्हिचसोबत होण्याची शक्यता आहे.
माजी विम्बल्डन चॅम्पियन अॅमेली मोरेस्मोच्या मार्गदर्शनाखाली जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेला मरे आपल्या मोहिमेची सुरुवात सोमवारपासून करणार आहे. मरेला पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत 1क्4 व्या स्थानावर असेलल्या बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
महिला विभागात पाचवेळा विजेतेपदाचा मान मिळविणारी अव्वल मानांकित सेरेना विलियम्स व 2क्क्4 ची चॅम्पियन मारिया शारापोव्हा यांना ड्रॉच्या एकाच क्वार्टरमध्ये स्थान मिळाले आहे. 2क्क्4 च्या अंतिम फेरीत सेरेनाचा पराभव करणा:या मारिया शारापोव्हाला पहिल्या फेरीत विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळविणा:या ब्रिटनच्या समंथाविरुद्ध लढत द्यावी लागेल, तर सेरेनासमोर जॉजिर्याच्या अन्ना तताशविलीचे आव्हान असेल.
फ्रेंच ओपन उपविजेती सिमोना हालेपला सलामीला येलेना यांकोव्हिचविरुद्ध लढत द्यावी लागणार असून अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काला अॅग्निस्का रदवांस्काशी भिडावे लागेल. (वृत्तसंस्था)
मरेला उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या डेव्हिड फेरर किंवा क्विन्स क्लब चॅम्पियन 11 वा मानांकित ग्रगोर दिमित्रोव्ह यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 2क्11चा विजेत्या जोकोव्हिचला सोमवारी कजाखस्तानच्या आंद्रेई ग्लुबेव्हविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे.