शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच, नदाल उपउपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: September 4, 2016 01:49 IST

रशियाच्या मिखाईल युज्नीने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यामुळे नोव्हाक जोकोविचचा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोनदा जेतेपद

न्यूयॉर्क : रशियाच्या मिखाईल युज्नीने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यामुळे नोव्हाक जोकोविचचा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोनदा जेतेपद पटकाविणाऱ्या राफेल नदालने तीन वर्षांत प्रथमच अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले. गत चॅम्पियन जोकोविच पहिल्या सेटमध्ये ४-२ ने आघाडीवर असताना रशियाच्या ३४ वर्षीय युज्नीने पायांचे स्नायू दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोविचसाठी पहिला आठवडा संघर्षपूर्ण ठरला. सोमवारी पहिल्या फेरीच्या लढतीत जॉर्जी यानोव्हिचचा पराभव करण्यासाठी जोकोविचला चार सेटपर्यंत घाम गाळावा लागला. चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लीने हाताच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे जोकोविचला दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाली. अव्वल मानांकित जोकोविचला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत ८४ व्या स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या केली एडमंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. एडमंडने अमेरिकेच्या जॉन इस्नरचा ६-४, ३-६, ६-२, ७-६ ने पराभव करीत ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत प्रथमच अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. नदालने रशियाच्या आंद्रेई कुज्नेत्सोव्हचा ६-१, ६-४, ६-२ ने पराभव करीत २०१३ नंतर प्रथमच प्री क्वॉर्टरमध्ये स्थान मिळवले. महिला एकेरीत आठव्या मानांकित मेडिसन किजने तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये १-५ ने पिछाडीनंतर पुनरागमन करीत जपानच्या नाओमी ओसाकाचा ७-५, ४-६, ७-६ ने पराभव केला. २६ वे मानांकन प्राप्त अमेरिकेच्या जॅक सॉकने २०१४ मध्ये चॅम्पियन असलेल्या मारिन सिलिचचा ६-४, ६-३, ६-३ ने पराभव करीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. आगामी फेरीत नवव्या मानांकित फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्सोंगाने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अ‍ॅन्डरसनचा ६-३, ६-४, ७-६ ने पराभव केला. कॅरोलिन व्होज्नियाकीने रोमानियाच्या मोनिका निकोलेस्क्यूचा ६-३, ६-१ ने पराभव करीत तिच्याविरुद्ध सातवा विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)

मिश्र दुहेरीत सानियाची सरशीभारतीय चाहत्यांसाठी आनंदाचे वृत्त म्हणजे, २०१४ ची चॅम्पियन सानिया व डोडिग जोडीने डोनाल्ड यंग व टेलर टाऊनसेंड जोडीचा केवळ ६२ मिनिटांमध्ये ६-४, ६-४ ने पराभवासह पुढची फेरी गाठली.मिश्र दुहेरीत बोपन्ना आगेकूच करण्यात यशस्वी ठरला. बोपन्ना व त्याची सहकारी कॅनडाची गॅब्रिएल दाब्रोवस्की या जोडीने केवळ ६७ मिनिटांमध्ये नोह रुबिन व जेमी लोएब या जोडीचा ७-५, ६-४ ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली.पुरुष दुहेरीत पेस, बोपन्ना पराभूतभारताचे पुरुष दुहेरीत अव्वल खेळाडू लिएंडर पेस व रोहन बोपन्ना यांना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत आपापल्या जोडीदारांसह पराभव स्वीकारावा लागला, तर सानियाने क्रोएशियाच्या इव्हान डोडिगच्या साथीने मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. पेस व जर्मनीचा त्याचा सहकारी आंद्रे बेगेमॅन यांना स्टिफन रॉबर्ट (फ्रान्स) व डुडी सेला (इस्राइल) या जोडीविरुद्ध ६-२, ५-७, ४-६ ने पराभव स्वीकारला. डेन्मार्कच्या फ्रेड्रिक नील्सनच्या साथीने खेळत असलेल्या बोपन्नाला अमेरिकेच्या ब्रायन बेकर व न्यूझीलंडच्या मार्कस डॅनियल या जोडीविरुद्ध २-६, ६-७ ने पराभवाला सामोरे जावे लागले.