लंडन : काल, रविवारी झालेल्या विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये स्वीत्ङरलडच्या रॉजर फेडररवर मात करून अजिंक्यपदाचा मान मिळविणा:या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने ताज्या जागतिक टेनिस मानांकनात पुन्हा अव्वल क्रमांकावर ताबा मिळविला आह़े मात्र, ब्रिटनच्या अँडी मरेची ताज्या मानांकनात घसरण झाली आह़े
सर्बियाच्या 27 वर्षीय जोकोव्हिचने स्पेनच्या राफेल नदाल याला मागे टाकून नंबर वनचा ताज पटकावला आह़े जोकोव्हिचने दुस:यांदा विम्बल्डनचे जेतेपद मिळविले आह़े याच बळावर त्याने जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर ङोप घेतली आह़े विम्बल्डनचे जेतेपद मिळविल्यामुळे जोकोव्हिच याने लंडनमध्ये सत्रच्या अखेरीस होणा:या वर्ल्ड टूर फायनल्ससाठीही पात्रता मिळविली आह़े
ताज्या मानांकनात आता राफेल नदाल दुस:या क्रमांकावर पोहोचला आहे, तर रॉजर फेडरर तिस:या स्थानावर आणि ब्रिटनचा अनुभवी टेनिसपटू अँडी मरे दहाव्या क्रमांकावर फेकला गेला आह़े स्वीत्ङरलडचा स्टेनिसलास वावरिंका चौथ्या क्रमांकावर पोहोचला आह़े (वृत्तसंस्था)
पुन्हा एकदा विम्बल्डनचे जेतेपद मिळवेन अशी अपेक्षा नव्हती़ विशेष म्हणजे चौथा सेट गमावल्यानंतर सामन्यात कमबॅक करणो खूप अवघड होत़े मात्र, महत्त्वाच्या क्षणी खेळ उंचावता आला याचा आनंद आह़े मी हा किताब भावी पत्नी आणि होणा:या मुलांना समर्पित करत आह़े हा किताब पुन्हा मिळविणो हा माङया आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आह़े
- नोव्हाक जोकोव्हिच