नाशिक : हैदराबाद येथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत नाशिक येथील दिव्य प्रशांत ब्रोचा याने अजिंक्यपद पटकावले़ यापूर्वी जिल्हास्तरीय स्पर्धा व मुंबई महापौर बुद्धिबळ चषक स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या दिव्य याची हैदराबाद येथे झालेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली होती़ या स्पर्धेत अंतिम फे रीत हैदराबादचाच तेजा सुरेश याचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले़ दिव्य हा विस्डम हायस्कूलचा विद्यार्थी आहे़
बुद्धिबळ राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचा दिव्य अजिंक्य
By admin | Updated: May 13, 2014 06:21 IST