शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयाच्या वादग्रस्त क्रीडासंहितेवर होणार चर्चा

By admin | Updated: December 23, 2015 01:13 IST

क्रीडा मंत्रालयाच्या वादग्रस्त क्रीडासंहितेच्या मुद्द्यावर काही राष्ट्रीय क्रीडा महासंघांची मान्यता रद्द करण्याची धमकी किती परिणामकारक ठरणार,

गुवाहाटी : क्रीडा मंत्रालयाच्या वादग्रस्त क्रीडासंहितेच्या मुद्द्यावर काही राष्ट्रीय क्रीडा महासंघांची मान्यता रद्द करण्याची धमकी किती परिणामकारक ठरणार, हे उद्या (बुधवारी) येथे होणाऱ्या भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या वार्षिक बैठकीत निश्चित होईल.याशिवाय, गुवाहाटी आणि शिलाँग येथे १६ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या १६व्या द. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावादेखील याच बैठकीत घेण्यात येईल. पायाभूत सुविधांच्या उभारणीवर काही राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी आक्षेप नोंदविला आहे. स्पर्धेतील अधिकाधिक क्रीडाप्रकारांचे यजमानपद गुवाहाटीकडे असेल. वृत्तानुसार, आसामच्या राजधानीच्या शहरात हॉकी आणि नेमबाजी स्पर्धा आयोजित करणे कठीण आहे, कारण त्यासाठी पायाभूत सुविधांच्या नूतनीकरणासाठी कुठल्याची रकमेची तरतूद नाही. एकूण २३ क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात येणार असून, शिलाँगला ७ क्रीडाप्रकार होतील. त्यांत बॅडमिंटनचादेखील समावेश होता; पण भारतीय बॅडमिंटन संघटनेने मेघालयाच्या राजधानीत सामने घेण्यास आक्षेप नोंदविल्यामुळे बॅडमिंटनचे आयोजन गुवाहाटीकडे सोपविण्यात आले.याशिवाय, आमसभेत चर्चेला येणाऱ्या महत्त्वाच्या विषयात क्रीडा मंत्रालय आणि अ. भा. टेनिस संघ तसेच भारतीय ज्यूदो महासंघात सुरू असलेला तणावाचा समावेश राहील. क्रीडा मंत्रालयाने टेनिस आणि ज्यूदो महासंघाच्या अध्यक्षांना पदाचा राजीनामा देण्यास आंगितले आहे. या महासंघाचे अध्यक्ष नव्या क्रीडासंहितेनुसार ब्रेक न घेताच पदावर कायम आहेत. आम्ही क्रीडासंहिता मोडली नसल्याचा दावा दोन्ही महासंघांनी केला. यावर आमसभेत चर्चा होईल. (वृत्तसंस्था)