शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

मुंबईची कठीण परीक्षा

By admin | Updated: May 13, 2015 23:23 IST

सलग पाच शानदार विजयांसह जबरदस्त फॉर्ममध्ये आलेल्या मुंबईचा अश्व बंगळुरूने १० मेला झालेल्या सामन्यात रोखला. या वेळी एबी डिव्हिलियर्स आणि

मुंबई : गतसामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झालेल्या पराभवाने प्ले आॅफसाठी खडतर मार्ग झालेल्या मुंबई इंडियन्ससमोर आज घरच्या मैदानावर गतविजेते कोलकाता नाइट रायडर्सचे कडवे आव्हान असेल. प्ले आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला या सामन्यात फक्त विजय आवश्यक नसून, धावगती वाढवण्याचेदेखील आव्हान असेल. त्यामुळेच मुंबईला सर्वोत्तम खेळाशिवाय दुसरा पर्याय नसेल; तर केकेआर मात्र पहिल्या दोन क्रमांकामध्ये स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात असेल.सलग पाच शानदार विजयांसह जबरदस्त फॉर्ममध्ये आलेल्या मुंबईचा अश्व बंगळुरूने १० मेला झालेल्या सामन्यात रोखला. या वेळी एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्या दांडपट्ट्यापुढे मुंबईकर गोलंदाजांच्या मर्यादा पुन्हा एकवार स्पष्ट झाल्या. त्यामुळे मुंबईचे पहिले उद्दिष्ट असेल ते अचूक गोलंदाजीचे. बंगळुरूविरुद्ध जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या दोघांना ५० हून अधिक धावांचा चोप बसल्याने या दोघांपैकी एकाला आजच्या सामन्यात बाहेर बसावे लागेल हे नक्की. केवळ लसिथ मलिंगा चांगली गोलंदाजी करीत असून, मुंबईने अद्यापही कर्नाटकचा अनुभवी वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनला खेळवले नाही. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता वाटते. फलंदाजीच्या दृष्टीने लिंडल सिमेन्स आणि धडाकेबाज केरॉन पोलार्ड यांचा फॉर्म मुंबईला सुखावत असेल. सलामीवीर पार्थिव पटेलही चांगल्या लयीत दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा मात्र चाचपडताना दिसत असून त्याच्या फॉर्मची सध्या संघाला अत्यंत आवश्यकता आहे. एकदा का रोहित शर्मा फॉर्ममध्ये आला तर तो काय करू शकतो, हे प्रतिस्पर्धी संघालादेखील माहीत असल्याने त्यांचे प्रमुख लक्ष रोहितला लवकरात लवकर बाद करणे हेच असेल. दुसऱ्या बाजूला केकेआरने हैदराबाद, दिल्ली आणि पंजाब या संघांना मोक्याच्या वेळी पराभूत करून अव्वल तीन संघांत स्थान मिळवले आहे. त्यामुळे मुंबईला हरवून पहिल्या दोन संघंत स्थान मिळवण्याचे मुख्य लक्ष केकेआरचे आहे. कर्णधार गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण आणि आंद्रे रसेल यांच्यामुळे केकेआरची फलंदाजी मजबूत बनली आहे. तर गोलंदाजीमध्ये उमेश यादव आणि रसेल यांच्यासोबतच धोकादायक सुनील नरेन आणि ब्रॅड हॉग यांची जादुई गोलंदाजीदेखील मुंबईची ‘फिरकी’ घेऊ शकते. घरच्या मैदानावर यंदाच्या सत्रातील शेवटचा सामना खेळणारा मुंबई संघ १२ गुणांसह सहाव्या स्थानी असून, १७ मेला मुंबई शेवटचा साखळी सामना हैदराबादविरुद्ध खेळेल. त्याच वेळी कोलकाता १५ गुणांसह चेन्नईपाठोपाठ दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. (क्रीडा प्रतिनिधी)