शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ध्यानचंद यांच्या ‘भारतरत्न’चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!

By admin | Updated: August 26, 2016 20:52 IST

भारतीय हॉकीचे महान खेळाडू जगविख्यात मेजर ध्यानचंद यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यास होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 -  भारतीय हॉकीचे महान खेळाडू जगविख्यात मेजर ध्यानचंद यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यास होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक माजी हॉकीपटू येथील जंतर मंतरवर २८आॅगस्ट रोजी धरणे देणार आहेत.मेजर ध्यानचंद यांचा २९ आॅगस्ट हा जन्मदिवस. हा दिवस भारतात राष्टÑीय क्रीडा दिन पाळला जातो. याच दिवशी राष्टÑपती राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार राष्टÑपती भवनात खेळाडूंना प्रदान करतात. मेजर ध्यान चंदनॅशनल स्टेडियममध्येही त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.राज्यसभा सदस्य माजी हॉकी कर्णधार दिलीप तिर्की तसेच मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोककुमार यांच्यामते ध्यानचंद हे धरणे देणाºयांमध्ये प्रमुख असतील. अशोक म्हणाले,‘ ध्यानचंद यांच्याकडे सातत्याने डोळेझाक सुरू आहे.याकडे आम्ही वारंवार लक्ष वेधले. यंदादेखील आम्ही जंतरमंतरवर धरणे देत या मुद्याकडे लक्ष वेधणार आहोत.२०१३ च्या नोव्हेंबरमध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा निवृत्त होताच त्याच दिवशी त्याला भारतरत्न देण्याची घोषणा झाली होती. सचिन भारत रत्न मिळालेला पहिला भारतीय खेळाडू बनला. ध्यानचंद यांच्या भारतरत्नची मागणीमात्र त्याही पूर्वीपासून सुरूच आहे. सचिनला भारत रत्न दिल्यानंतर आता ध्यानचंद यांना हा सन्मान बहाल केला जाईल, अशी अपेक्षा होती पण संसद आणि संसदेबाहेरही वारंवार मागणी झाल्यानंतर ध्यानचंद यांच्याकडे सतत डोळेझाककरण्यात येत आहे.२८ ला जंतरमंतरवर होणाºया धरणे कार्यक्रमात दिलीप तिर्की, अशोक कुमार यांच्यासह जफर इक्बाल, अजितपालसिंग, महाराज कुमार कौशिक, एबी सुबय्या, मोहम्मद रियाझ, आशिष बल्लाळ, मुकेश कुमार आणि ए. के. बन्सल आदी सहभागीहोणार आहे. प्रख्यात वालुका शिल्पकार सुदर्शन पटनायक हे धरणे कार्यक्रमाचे  आकर्षण असतील.(वृत्तसंस्था)