शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

धोनीमुळे कारकिर्दीला कलाटणी मिळाली

By admin | Updated: January 12, 2017 01:15 IST

मर्यादित षटकांच्या सामन्यात डावाला सुरुवात करून घेण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या निर्णयामुळे, करिअरला कलाटणी मिळाल्याचे मत

नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या सामन्यात डावाला सुरुवात करून घेण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या निर्णयामुळे, करिअरला कलाटणी मिळाल्याचे मत वन डे क्रिकेटमधील शानदार फलंदाज रोहित शर्मा याने बुधवारी व्यक्त केले. विशेष मुलाखतीत रोहित म्हणाला, ‘वन डे क्रिकेटमध्ये डावाला सुरुवात करण्याच्या निर्णयाने माझ्या करियरला कलाटणी लाभली. हा निर्णय कर्णधार धोनीचा होता. त्यानंतर, मी उत्कृष्ट फलंदाज बनलो. यामुळे खेळातील बारकावे शिकता आले. परिस्थितीनुसार खेळ करण्यासाठी हवा असलेला संयम शिकलो.’रोहितने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध स्थानिक मालिकेत प्रथमच डावाची सुरुवात केली. सलामीवीर म्हणून त्याने मालिकेत ८० धावा केल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत स्वत:च्या भूमिकेला न्याय दिला.धोनीने सलामीवीराची भूमिका बजावण्यास सांगितल्याबद्दल रोहित म्हणाला, ‘धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तू डावाची सुरुवात करावी, असे मला वाटते. तू कट आणि पूलचे फटके उत्कृष्टपणे मारू शकतो. अपयश आले आणि टीका झाली, तरी खचून जाऊ नकोस.’ त्या वर्षी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार होते. धोनीला त्यादृष्टीने विचार करायचा होता. धोनीची खेळाडूंना ओळखण्याची क्षमता कल्पनेपलीकडची असल्याचे मत शर्मा याने व्यक्त केले.इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीने माझ्या आत्मविश्वासात भर पडल्याचे सांगून रोहित म्हणाला, ‘पांढऱ्या चेंडूने कुठलाही मारा खेळण्यास मी सज्ज झालो होतो.’ न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेदरम्यान मांसपेशी ताणल्या गेल्यापासून रोहित संघाबाहेर आहे. सध्या तो सराव करीत आहे.करुण नायरने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक ठोकताच रोहितचे संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. याबाबत विचारताच तो म्हणाला, ‘मी स्वत:ला असुरक्षित समजत नाही. आयुष्यात कसे पुढे जायचे, याची मला माहिती आहे. सत्य असे आहे की, करुणला संधी मिळाली आणि त्याने त्रिशतक ठोकले. त्याचे कौतुक व्हायला हवे. करुण आणि लोकेश राहुल यांनी सुरेख फलंदाजी केली, पण मालिकेत यशाचे श्रेय अश्विन, शमी आणि रवींद्र जडेजा यांना जाते.’जांघेतील जखमेवर शस्त्रक्रिया होताच, रोहितने आठ आठवडे फिटनेसवर खर्च केले. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल तो म्हणाला, ‘पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी १२-१४ आठवडे लागतील. याचा अर्थ, आणखी चार ते सहा आठवड्यानंतर मैदानावर येईल. सामान्यपणे नेटमध्ये सराव आणि क्षेत्ररक्षणाला सुरुवात करणार आहे.’ रोहितला स्थानिक सामन्यात खेळणे अनिवार्य आहे. विजय हजारे करंडक सामने या महिनाअखेरीस सुरू होतील. (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया मालिकेबद्दल मला माहिती नाही, पण काही सराव सामने खेळावे लागतील. क्लब सामन्यात खेळण्यासाठी एमसीएचीदेखील परवानगी घ्यावी लागेल. दहा वर्षांहून अधिक काळापासून मी क्लब क्रिकेट खेळलो नाही. दुखापतीच्या काळात मी कुटुंबीयांसोबत भरपूर वेळ घालविला आहे. मी कठोर मनाचा असलो, तरी माझी पत्नी रितिका माझ्याहून अधिक कणखर वृत्तीची आहे. मी घरी आलो की, तिच्यासोबत चर्चा करतो. यातून माझ्या आत्मविश्वासात भर पडते.- रोहित शर्मा