शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
3
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
4
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
5
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
6
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
7
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
8
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
9
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
10
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
11
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
13
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
14
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
15
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
16
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
17
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
18
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
19
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
20
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

‘सरप्राईज’ निकालाची धोनीला संधी

By admin | Updated: July 9, 2014 01:52 IST

मंगळवारच्या दुपारी ट्रेंटब्रिज क्रिकेट मैदानावर महेंद्रसिंग धोनीशी भेट झाली. भारतीय कर्णधाराचा चेहरा आनंदी वाटत होता.

नॉटिंघम : मंगळवारच्या दुपारी ट्रेंटब्रिज क्रिकेट मैदानावर महेंद्रसिंग धोनीशी भेट झाली. भारतीय कर्णधाराचा चेहरा आनंदी वाटत होता. पहिल्या कसोटी सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी धोनी अगदी जॉली मुडमध्ये दिसला. सोमवारीच संघाने माहीचा वाढदिवस साजरा केला. केक कापण्याचाही कार्यक्रम झाला. विराट, रोहित आणि रवींद्र जडेजा यांनी या केकने माहीच्या चेह:याची चांगलीच मसाज केल्याने कुणाला हा केक खाता आला नव्हता.
संघात संचारलेला हा उत्साह नेट प्रॅक्टिमध्येही ओसंडून वाहत होता. विजयासाठी मेहनत घेण्याची वृत्ती खेळाडूंच्या सरावात दिसली. सात वर्षापूर्वीचा प्रसंग मला आठवला. 2क्क्7 ला धोनी पहिल्यांदा इंग्लिश दौ:यावर आला होता. या दौ:यात त्याच्यासह अनेकांनी खास कामगिरी केली. लॉर्डस्वरील पहिल्या कसोटीत त्याने अखेरचा फलंदाज एस. श्रीसंतला सोबत घेऊन मॅचविनिंग अर्धशतकी खेळी केली होती. तेव्हापासून धोनी आणि टीम इंडियाचे भाग्यच फळफळले. यानंतर भारतीय संघाने इंग्लंडची त्रेधा उडविली. ट्रेंटब्रिज कसोटी जिंकून मालिका खिशात घातली. अखेरची कसोटी सुरू होण्याआधीच द. आफ्रिकेत आयोजित टी-2क् विश्वचषकासाठी धोनीची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. उर्वरित इतिहास क्रिकेट चाहत्यांना ठाऊक असेलच. तेव्हापासून धोनी अँड कंपनीने प्रत्येक महत्त्वाची स्पर्धा जिंकली आहे. 
पण तरीही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. धोनीबाबतही हे घडले. अलीकडे अनेक जय-पराजयाचे चढउतार आले; पण तरही नेतृत्व जोपासून ठेवण्यात  धोनी यशस्वी ठरला. आताच्या संघात तो एकमेव दीर्घानुभवी खेळाडू आहे. केवळ ईशांत आणि रोहित शर्मा यांचा अपवाद वगळता इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा अनुभव कुणालाही नाही. अर्थात भारतीय संघाचा धसका स्वत: प्रतिस्पर्धी कर्णधार अॅलिस्टर कूक याने घेतलेला दिसतो. घरच्या खेळपट्टय़ांवर यशस्वी होऊ किंवा नाही याबद्दल कूकला शंका वाटते. त्यामुळेच आश्चर्यकारक निकाल देण्याची संधी धोनी अँड कंपनीला असेल. 
धोनी म्हणतो, ‘मी जेव्हा आक्रमक असतो तेव्हा सहज फलंदाजीच्या तुलनेत अधिक चांगला खेळतो. पहिल्या चेंडूपासूनच धाव काढण्यासाठी तुटून पडतो. मी नेहमी आपल्या सहजप्रवृत्तीला चिकटून राहात आलो आहे. आक्रमक स्ट्रोक्स खेळूनच मी माझी ताकद सिद्ध करु शकतो.’