शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

व्हिट्टोरीच्या ड्रीम टीममध्ये धोनीला स्थान नाही, विराट कर्णधार

By admin | Updated: May 10, 2017 11:02 IST

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिट्टोरीने काल आपल्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीला स्थान मिळाले नाही.

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 10 - न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनियल व्हिट्टोरीने काल आपल्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीला स्थान मिळाले नाही. व्हिट्टोरीने आपल्या ड्रीम टीमचे नेतृत्व रणमशीन विराट कोहलीकडे सोपवले आहे. लॉर्डस क्रिकेट मैदानाच्या सहकार्याने व्हिट्टोरीने आपल्या ड्रीम टीमची निवड केली. ज्या खेळाडूंसोबत, विरुद्ध आपण खेळलो किंवा ज्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, अशा खेळाडूंची संघात निवड करायची होती. यामध्ये भारताच्या तीन, ऑस्ट्रेलियाच्या चार, श्रीलंकेच्या दोन, आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा समावेश आहे. द. आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसची 12 वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. व्हिट्टोरीने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहलीची आपल्या ऑल टाइम इलेव्हनमध्ये निवड केली आहे. आयपीएलमध्ये आरसीबीचा मुख्य कोच असलेल्या व्हिट्टोरीने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंग, विकेटकीपर फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट, महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि फिरकीपटू शेन वॉर्नची संघात निवड केली आहे. न्यूझीलंडकडून महान अष्टपैलू खेळाडू सर रिचर्ड हॅडली यांचीच संघात निवड होऊ शकली. श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि मुथय्या मुरलीधरन तर द. आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलर्स यांची निवड केली आहे. व्हिट्टोरीने 113 कसोटींत 362 बळी घेतले आहेत. व्हिट्टोरी रंगना हेराथनंतर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने कसोटीत 20 वेळा 5 पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. व्हिट्टोरीची ड्रीम टीमरिकी पॉटिंग, राहुल द्रविड, विराट कोहली (कर्णधार), ए. बी. डिव्हिलर्स, सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, रिचर्ड हॅडली, जॅक कॅलिस.