शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजीदरम्यान धवनने फोडला लॅपटॉप....

By admin | Updated: April 16, 2017 15:13 IST

आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईटराडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीत सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा

ऑनलाइन लोकमत 
कोलकाता, दि. 16 - आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईटराडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीत सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला. या लढतीत हैदराबादचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन विशेष चमक दाखवू शकला नाही. पण या लढतीमधील धवनचा एक फटका मात्र सामन्यादरम्यान चर्चेचा विषय ठरला.  हैदराबादच्या डावातील दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर धवनने थर्ड मॅनच्या दिशेने एक जोरदार फटका मारला. त्यावेळी चेंडू थेट सनरायझर्सच्या डगआऊटच्या दिशेने गेला.  हा चेंडू डगआऊटमध्ये खेळाचे विश्लेषण करत असलेल्या विश्लेषकाच्या लॅपटॉपवर जाऊन बसला. या फटक्याचा जोर एवढा होता की चेंडू आदळल्याबरोबर लॅपटॉपचे काम तमाम झाले.  
डावाच्या सुरुवातीला शिखर धवनने आक्रमक पवित्रा घेतला.  त्याने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शॉर्ट थर्डमॅनवरून टोलवला. कोलकाता नाईटरायडर्सने थर्डमॅनवर क्षेत्ररक्षक तैनात केलेला नसल्याचे चेंडू थेट सीमापार गेला. चेंडू आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिल्यावर सनरायझर्सच्या डगआऊटमध्ये बसलेल्या विश्लेषकाची भंबेरी उडाली. चेंडू आपल्यावर आदळणार असल्याच्या भीतीने हा विश्लेषक मागे सरकला. तेवढ्यात चेंडू लॅपटॉपवर आदळला. या फटक्याने लॅपटॉपच्या स्क्रीनचे नुकसान झाले. तसेच लॅपटॉप बंद पडला. या प्रकारामुळे व्ही. व्ही. एस. लक्ष्मण त्या विश्लेषकांवर फार नाराज झाला. 
या लढतीत  रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या दहाव्या पर्वात शनिवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादचा १७ धावांनी पराभव करीत, सलग दुसरा विजय नोंदवला. 
सामनावीर उथप्पाच्या (६८) अर्धशतकी खेळीच्या जोरावर केकेआर संघाने ६ बाद १७२ धावांची मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाचा डाव निर्धारित २० षटकांत ६ बाद १५५ धावांत रोखला.