शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

धरमशालाची खेळपट्टी उसळी घेणारी

By admin | Updated: March 23, 2017 23:32 IST

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात उद्या (शनिवार)पासून सुरू होत असलेल्या चौथ्या तसेच निर्णायक कसोटीसाठी उसळी घेणारी खेळपट्टी तयार

धरमशाला : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात उद्या (शनिवार)पासून सुरू होत असलेल्या चौथ्या तसेच निर्णायक कसोटीसाठी उसळी घेणारी खेळपट्टी तयार करण्यात आल्याची माहिती हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे क्युरेटर सुनील चौहान यांनी गुरुवारी दिली. खेळपट्टी तयार करण्यात संघ व्यवस्थापनाचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले.चौहान म्हणाले, ‘‘आजपर्यंत मला कुणाचेही निर्देश मिळालेले नाही. पारंपरिक लौकिक ओळखून मी विकेट तयार करतो. ही खेळपट्टी उसळी घेणारी असेल. येथे पुल आणि कटचे फटके मारणाऱ्या फलंदाजांची ‘चलती’ राहील.’’ रोहित शर्मा याने याच मैदानावर टी-२० सामन्यात शतक ठोकले होते. या मैदानावर ५ दिवस सामना चालेल, असा विश्वासदेखील चौहान यांनी व्यक्त केला. धरमशाला येथे नेहमीच निकाल देणारी खेळपट्टी तयार करीत असतो. रणजी सामन्याचा निकालदेखील चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत लागला होता. येथील परिस्थितीनुसार वेगवान गोलंदाजांना अधिक बळी मिळतात. मध्य प्रदेशाकडून ईश्वर पांडे आणि बंगालकडून अशोक डिंडा यांनी रणजी सामन्यात येथे अधिक बळी घेतले आहेत. प्रत्येक मोसमात आम्ही खेळपट्टीवरील मातीचा वरचा थर बदलत असतो. लुधियाना येथे मिळणारी विशेष प्रकारची माती येथे काही वर्षांपासून वापरण्यात येत आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)गिलख्रिस्टकडून कोहलीचे कौतुकमेलबोर्न : उभय देशांमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्ध आता संपायला हवे, असे आवाहन करीत माजी यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने विराट कोहली हा क्रिकेटमधील अप्रतिम कर्णधार असल्याचे म्हटले आहे. या मालिकेत कोहलीचा खेळ अद्यापपर्यंत बहरला नसला, तरी अखेरच्या सामन्यात तो मोठी खेळू करू शकतो. संघाची गरज ओळखून धावा काढण्यात त्याचा हातखंडा आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आणि उत्कृष्ट प्रतिस्पर्धी असल्यामुळे परस्परांचा सन्मान बाळगतात. प्रतिस्पर्धा ही मालिकेचा भाग आहे; पण खेळाडूंमध्ये वैयक्तिक वैर नाही, ही खेळासाठी उत्कृष्ट बाब म्हणावी लागेल.’’

आॅस्ट्रेलिया संघात ओकिफीऐवजी बर्ड-चौथ्या कसोटीत भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाच्या अंतिम एकादशमध्ये स्टीव्ह ओकिफीऐवजी जॅक्सन बर्ड याला संघात स्थान मिळू शकते. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जात आहे. त्यामुळेच स्टीव्ह स्मिथ बर्डला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळविण्यास इच्छुक आहे. पुणे कसोटीत विजयाचा नायक ठरलेला ओकिफी पुढच्या दोन्ही कसोट्यांत मात्र तितका प्रभावी ठरला नव्हता. रांचीच्या तिसऱ्या कसोटीत त्याने ७७ षटके गोलंदाजी करूनही यश मिळू शकले नव्हते. दुसरा फिरकी गोलंदाज नाथन लियोन याने आज नेटवर सराव केला नाही; पण कुठल्याही खेळपट्टीवर चेंडू वळविण्यात व उसळी घेणारे चेंडू टाकण्यात तरबेज मानल्या जाणाऱ्या नाथनचे खेळणे निश्चित आहे. आज सरावादरम्यान बर्डने डेव्हिड वॉर्नरला गोलंदाजी केली. त्याच्या चेंडूवर वॉर्नर काही वेळ विचलित झाला.