शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

बंदी रद्द करण्याची केसीएची मागणी

By admin | Updated: July 27, 2015 00:03 IST

वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवरील बंदीची शिक्षा रद्द करण्यासाठी केरळ क्रिकेट संघटना (केसीए) प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पत्र लिहून बीसीसीआयला

कोची : वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवरील बंदीची शिक्षा रद्द करण्यासाठी केरळ क्रिकेट संघटना (केसीए) प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पत्र लिहून बीसीसीआयला विनंती करण्याचा निर्णय आज केसीएने घेतला आहे. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्लीतील एका न्यायालयाने श्रीसंत निर्दोष असल्याचा निर्णय दिला. केसीएचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष टीसी मॅथ्यू बीसीसीआयला पत्र लिहिणार आहेत.केसीएचे सचिव टीएन अनंतनारायणन म्हणाले, ‘आम्ही बीसीसीआयकडे बंदीची शिक्षा रद्द करण्यासाठी अपील करणार आहोत. आम्ही लवकरच बीसीसीआयला पत्र लिहिणार आहोत, कारण न्यायालयाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत निर्दोष असल्याचा निर्णय दिला आहे. केसीएच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शनिवारी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तीन क्रिकेटपटू श्रीसंत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यावरील बंदीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. दरम्यान दिल्लीतील एका न्यायालयाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. त्यानंतर श्रीसंत दिल्लीहून स्वगृही परतल्यानंतर त्याचे चाहते, मित्र व नातेवाईकांनी कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे भावनिक स्वागत केले. श्रीसंत म्हणाला, ‘जीवन आणि कारकीर्द पुन्हा एकदा प्रारंभ करण्याची संधी मिळणार असल्यामुळे आनंद झाला. मी आजपासून सरावाला सुरुवात करणार आहे.’ बीसीसीआयतर्फे क्रिकेट खेळण्यावर असलेली बंदीची शिक्षा रद्द होईल, अशी आशा असल्याचे श्रीसंत म्हणाला.(वृत्तसंस्था)