शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या युवा फलंदाजांचा पुन्हा विजय

By admin | Updated: May 11, 2017 00:49 IST

इतर संघांविरोधात हाराकिरी करणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सला गुजरात लायन्स विरोधातच नेमका कसा सूर सापडतो, हा प्रश्न आज गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाला नक्कीच सतावत असेल.

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमतइतर संघांविरोधात हाराकिरी करणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सला गुजरात लायन्स विरोधातच नेमका कसा सूर सापडतो, हा प्रश्न आज गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाला नक्कीच सतावत असेल. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात पुन्हा एकदा गुजरातच्या लायन्स फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. मात्र यावेळी पंत ऐवजी अय्यरने ९६ धावांची तुफानी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. गुजरातने पहिल्या डावात १९५ धावा केल्या. अरॉन फिंच याने ३९ चेंडूत ६९ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारु दिली. कार्तिकने देखील ४० आणि इशान किशनने ३४ धावांचे योगदान दिले. गुजरातच्या गोलंदाजांनी दिल्लीला दुसऱ्या षटकात मोठा झटका दिला. संगवानने संजू सॅमसनला तंबूत परत पाठवले. रैनाच्या अफलातून फेकीने रिषभ पंच फक्त ४ धावांवर धावबाद झाला. करुण नायर १५ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरने एका बाजुने तुफानी हल्ला चढवत १५ चौकार आणि २ षटकार लगावत ९६ धावा केल्या. दिल्ली डेअरडेविल्सच्या या युवा फलंदाजाने कोणतीही साथ मिळत नसताना गुजरातला सळो की पळो करुन सोडले. त्यातच मार्लोन सॅम्युअल्स आणि कोरी अँडरसन हे देखील धावबाद झाले. मात्र पॅट कमिन्सने श्रेयसला चांगली साथ दिली दोघांनी ६२ धावांची भागिदारी केली. त्यात पॅटने २४ धावांचे योगदान दिले.अखेरच्या षटकांत दिल्ली विजयाच्या आणि अय्यर शतकाच्या समीप असताना बसील थम्पीने अय्यरला बाद केले. शतकाला फक्त चार धावा शिल्लक असताना अय्यर बाद झाला. अय्यर बाद झाल्याने रैनाचा चेहरा खुलला, मात्र त्यानंतर अमित मिश्राने थम्पीच्या त्याच षटकांत सलग दोन चौकार लगावत विजय मिळवून दिला. दिल्ली डेअरडेविल्स आणि गुजरात लायन्स हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर पडल्याने हा सामना निव्वळ औपचारिकता म्हणून खेळला गेला. दिल्लीला आणखी दोन तर गुजरातला आणखी एक सामना खेळायचा आहे.